You are currently viewing थोर पुरुषांची नावे गाडीवर वापरून गाईंची गैरप्रकारे वाहतूक रोखावी; राष्ट्रीय संघटनेचे पोलिसांना निवेदन सादर 

थोर पुरुषांची नावे गाडीवर वापरून गाईंची गैरप्रकारे वाहतूक रोखावी; राष्ट्रीय संघटनेचे पोलिसांना निवेदन सादर 

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठया प्रमाणात गाई व गुरे याची वाहतूक होत आहे. कणकवली या ठिकाणी एका आयशर गाडीतून गाईची कोंबून वाहतूक होत होती. ही वाहतूक गैरप्रकारे होत होती. ही गाडी पकडण्यात आली आहे. सदर आयशर गाडीवर छत्रपती तसेच छावा या शब्दाचा वापर केला होता. ऐतिहासिक थोर पुरुषांची नावे वापरून हे चूकीचे प्रकार वाढले आहेत,कणकवली या ठिकाणी गाडीतून गैरप्रकारे गायींची वाहतूक केली जात होती संबंधित गाडी चालकावर व गाडीमालकावर कडक कारवाई करुन असे प्रकार रोखावे असे निवेदन राष्ट्रीय संघटना सिंधुदुर्ग विभागातर्फे सावंतवाडी पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर, उपाध्यक्ष रामचंद्र कुडाळकर, सिंधुदूर्ग जिल्हा प्रवक्ते शिवा गावडे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संदीप नाईक, माडखोल अध्यक्ष संदीप चांदरकर, ज्ञानेश्वर पारधी, उमेश तळवणेकर,  सघटनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा