You are currently viewing कॅथॉलिक पतसंस्थेकडून “समुह कर्ज सुरक्षा योजना” अंतर्गत मयत कर्जदारांच्या वारसांना २ लाख अर्थसाहय्य प्रदान

कॅथॉलिक पतसंस्थेकडून “समुह कर्ज सुरक्षा योजना” अंतर्गत मयत कर्जदारांच्या वारसांना २ लाख अर्थसाहय्य प्रदान

सावंतवाडी

कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा.लि. सावंतवाडी या पतसंस्थेमार्फेत संस्थेच्या कर्जदारांकरीता त्यांच्या हिताच्या दृष्टीने “समुह कर्ज सुरक्षा योजना” सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत कर्जदाराचा रू.२ लाख चा विमा उतरविण्यात येतो. अलीकडेच संस्थेचे मयत झालेले कर्जदार कै. राजन खेमबहादूर थापा व कै. गोविंद लक्ष्मण शेलटे राहणार शिरोडा ता. वेंगुर्ला यांच्या वारसांना या योजने अंतर्गत संस्थेचे सेक्रेटरी श्री मार्टीन आल्मेडा व सरव्यस्थापक श्री जेम्स बॉर्जीस यांच्या हस्ते, संस्थेमार्फेत प्रत्येकी २ लाखाचा धनादेश देऊन आर्थिक मदत करण्यात आली. संस्थेमार्फेत केलेल्या या मदतीकरीता मयत कर्जदारांच्या वारसांनी संस्थेचे तसेच संस्थेच्या संचालक मंडळाचे आभार मानले व संस्थेच्या कार्याबद्दल कौतुकही केले. संस्थेमार्फत सुरू करण्यात आलेल्या या विमा योजनेचा फायदा कर्जदारांच्या वारसांना देण्यात आला म्हणून संस्थेचे अध्यक्ष मा. श्री पि. एफ डॉन्टस यांनी समाधान व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा