You are currently viewing घावनळे येथे ग्रामपंचायत आपल्या दारी हा अभिनव उपक्रम संपन्न

घावनळे येथे ग्रामपंचायत आपल्या दारी हा अभिनव उपक्रम संपन्न

कुडाळ :

घावनळे येथे ग्रामपंचायत आपल्या दारी हा अभिनव उपक्रम सोमवार दिनांक १० एप्रिल पासून राबविण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य स्वरा समीर धुरी यांच्या घरी पहिली सभा प्रभाग क्रमांक एक मध्ये संपन्न झाली. दिनांक १३ एप्रिल रोजी प्रभाग क्रमांक चार मध्ये चावडी महापूर्वस या मंदिरामध्ये अंतिम दिवसाची अंतिम सभा संपन्न झाली. दुग्धशर्करा योग म्हणजे निवजे गावचे सरपंच महेंद्र पिंगुळकर या ठिकाणी संगीत क्लासेस घेतात. त्यानिमित्ताने त्यांनी देखील उपस्थित राहून या उपक्रमाचे कौतुक केले.

ग्रामपंचायत घावनळेच्या इतिहासात पहिल्यांदाच माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दिनेश वारंग आणि गटसाचिव श्री. भूषण चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा अभिनव उपक्रम सरपंच सौ. आरती वारंग उपसरपंच योगेश जी घाडीगावकर आणि सर्व सदस्य यांनी सुरू केला. १० एप्रिल रोजी प्रभाग क्रमांक १, १२ एप्रिल रोजी प्रभाग क्रमांक २, १३ एप्रिल रोजी प्रभाग क्रमांक ३ वांगणवाडी, गावकरवाडी, भीमनगर आणि गावठणवाडी अशाप्रकारे या सभांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थांनी या अभिनव उपक्रमास मोलाचे सहकार्य केले. त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे ग्रामपंचायतच्या वतीने आभार मानण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + 18 =