उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून 76 बसच्या तपासण्या करुन 49 बसेसना तपासणी प्रतिवेदन प्रदान
सिंधुदुर्गनगरी
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या वायुवेग पथक व महसूल सुरक्षा पथक (ST) यांच्या संयुक्त पथकाद्वारे ओसरगाव टोल नाका येथे रात्रीच्या वेळेस बस तपासणी करण्यात आल्या.यामध्ये एकूण 76 बस तपासण्यात आल्या आहेत. त्यापैकी 49 बसेसना तपासणी प्रतिवेदन देण्यात आली. त्यामध्ये मुख्यतः वाहन कर, योग्यता प्रमाणपत्र, रोड परमिट, विमा, पीयुसी , प्रथमोपचार पेटी, आपत्कालीन दरवाजा (emergency exit), dazzling lights, fire extinguisher, वाहनांच्या टपावर माल वाहतूक, इत्यादी बाबींची तपासणी करून त्यांना तपासणी प्रतिवेदन देण्यात आले आहेत.