You are currently viewing कुडाळ पोलिसांकडून सोशल मीडियावरील फसवणूकीबाबत जनजागृती…

कुडाळ पोलिसांकडून सोशल मीडियावरील फसवणूकीबाबत जनजागृती…

कुडाळ

सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारी फसवणूक याबाबत कुडाळ पोलिसांनी कुडाळ एस. टी. बस स्थानक येथे जनजागृती केली. यामध्ये कशाप्रकारे सावधगिरी बाळगली पाहिजे याची माहिती दिली. यावेळी पोलीस निरीक्षक शंकर चिंदरकर उपस्थित होते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर फसवणुकीचे गुन्हे वाढत आहेत. यामध्ये आर्थिक फसवणूक असेल किंवा इतर फसवणूक याबाबत जनजागृती करण्यासाठी कुडाळ पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचारी यांनी कुडाळ एस. टी. बस स्थानक येथील प्रवाशांना याबाबत माहिती दिली. सोशल मीडियाच्या माध्यमातून येणारे कॉल तसेच आर्थिक बाबतचे संदेश हे कटाक्षाने टाळा तसेच आपण वापरत असलेले सोशल मीडियाचे माध्यमांचे पासवर्ड कठीण ठेवा असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पोलीस अधिकारी श्री. माने तसेच संजय कदम, श्री. हिप्परकर, वहातूक नियंत्रक गवस उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा