वेंगुर्ला :
अण्णासाहेब देसाई विद्यामंदीर परुळे येथील विद्याप्रसारक विश्वस्त मंडळ परुळेचे संस्थापक संचालक मा. स्व.कृष्णाजी रामचंद्र तोरसकर उर्फ तोरसकर मास्तर यांचा ६१ वा स्मृती दिनानिमित्ताने प्रशालेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. प्रशालेत झालेल्या या कार्यक्रमाच्या वेळी अध्यक्ष बी एस नाईक, संस्थेचे मोहन देसाई, डॉ. उमाकांत सामत, अविनाश देसाई प्रमुख पाहूणे, विष्णू परब रविंद्र परब, मुख्याध्यापक एस. एम माने, पालक प्रतिनीधी शंकर घोगळे सह शिक्षक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. विद्याप्रसारक विश्वस्त मंडळाने १५ जुन १९५७ रोजी अण्णासाहेब देसाई व कृष्णाजी रामचंद्र तोरसकर यांच्यासह अन्य सहा शिक्षणप्रेमी मंडळीनी परुळे येथे गावात शिक्षणाची मुहूर्तमेठ रोवली त्याचा आज वटवृक्ष झाला आहे.
या सर्व संस्थापक संचालक मंडळीचे स्मरण करणे आवश्यक आहे. यावेळी निवती पोलीस ठाणे तर्फ घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा व चित्रकाया स्पर्धा यांच्या विजेत्यांना मान्यवर यांच्याहस्ते. बक्षीस वितरीत करण्यात आले. माजी विद्यार्थी व तोरसकर यांचे नातू विष्णू परब यांनी शाळेसाठी धनादेश शाळेकडे सुपुर्द केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभू पचलिंग यांनी केले.