उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा खेळाडूंनी लाभ घ्यावा -जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस
सिंधुदुर्गनगरी
खेळाच्या प्रचार व प्रसार यानुसार फक्त खेळाडूंचा जास्तीत जास्त सहभाग व संघाची संख्या वाढवणे यावर लक्ष केंद्रित न करता गावपातळी पासून चांगले खेळाडू तयार होणे अपेक्षित आहे. यासाठी 8 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तर, जिल्हास्तरावर खेळ निहाय व शारीरिक क्षमता (Physical Fitness) खेळांचे प्राथमिक कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन झाल्यास खेळामध्ये सहभाग वाढून, शारीरिक क्षमता, शारीरिक सुदृढता यामध्ये वाढ होऊन शालेय विद्यार्थ्यांचे आयोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे. यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व खेळाडूंनी या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, विद्या शिरस यांनी केले आहे.
खेळाचे नाव ,मल्लखांब जयगणेश इंग्लिश मिडियम स्कुल मालवण येथे दि. 17 ते 27 एप्रिल 2023 रोजी सकाळी 8 ते 10 व सायं 5 ते 7 वेळेत, शांताराम जोशी मो.9421230886 याक्रमांकावर संपर्क साधावा. बास्केटबॉल जयगणेश इंग्लिश मिडियम स्कुल मालवण येथे दि.17 ते 27 एप्रिल 2023 रोजी सकाळी 8 ते 10 व सायं. 5 ते 7 या वेळेत,अजय शिंदे मो. 9422394186 या क्रमांकवर संपर्क साधावा. बॉक्सिंग जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे दि.17 ते 27 एप्रिल रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत, एकनाथ चव्हाण मो.8108753626 या क्रमांका वर संपर्क साधावा. कबड्डी, जिमखाना स्टेडीयम नगरपरिषद,सावंतवाडी येथे दि. 17 ते 27 एप्रिल 2023 रोजी दुपारी 3 ते सायं. 6 वेळेत. ॲलिस्का अलमेडा 7447518788 या क्रमांकावर संपर्क साधावा. वेटलिफ्टींग, वराडकर हायस्कुल कट्टा ता. मालवण येथे दि. 17 ते 27 एप्रिल 2023 रोजी सकाळी 8 ते 10 वेळेत, संजय पेंडूरकर 9422392790 या क्रमांकावर संपर्क साधावा. पॉवर लिफ्टींग जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे दि. 17 ते 27 एप्रिल 2023 रोजी सायं. 4 ते 7 वेळेत विजय शिंदे 8208882591 या क्रमांकावर संपर्क साधावा. कॅरम, पंचम खेमराज विद्यालय सावंतवाडी येथे दि. 17 ते 27 एप्रिल 2023 रोजी सकाळी 8 ते 10 यावेळेत योगेश फणसळकर 7620755766 या क्रमांकावर संपर्क साधावा. बुध्दीबळ, ऑनलाईन दि.17 ते 27 एप्रिल 2023 रोजी सायं.7 ते 9 यावेळेत श्रीकृष्ण आडेलकर 9422381949 या क्रमांकावर संपर्क साधावा. रायफलशुटींग सावंतवाडी उपरकर शुटींगरेंज दि. 17 ते 21 एप्रिल 2023 रोजी सकाळी 8 ते 10 यावेळेत, शुटींगरेंज वेंगुर्ला येथे दि.22 ते 27 रोजी सायं. 4 ते 6 यावेळेत, काचंन उपरकर 9527417680 याक्रमांकावर संपर्क साधावा.