You are currently viewing सायबर गुन्हे घडण्यामागे हव्यास आणि निष्काळजीपणा जबाबदार – सौरभकुमार अग्रवाल

सायबर गुन्हे घडण्यामागे हव्यास आणि निष्काळजीपणा जबाबदार – सौरभकुमार अग्रवाल

शिरोडा-वेळागर येथे सायबर क्राईम जनजागृती…

वेंगुर्ले

सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. सायबर गुन्हे घडण्याच्या मागे संबंधितांचा हव्यास आणि निष्काळजीपणा ही दोन कारणे आहेत. यापासून सावध राहीले पाहिजे. वेळीच पोलीस यंत्रणेकडे तक्रार दाखल केली पाहिजे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी शिरोडा-वेळागर येथे केले.

पोलीस दलामार्फत पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक वेंगुर्ला यांच्या संकल्पनेतून व पोलीस हवालदार रंजिता चौहान यांच्या उत्कृष्ट पतकथेतुन वेंगुर्ला पोलीस ठाण्याकडुन शिरोडा वेळागर समुद्र किनारी ‘सायबर क्राईम जनजागृती अभियान’ राबविण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी सायबर क्राईम पासुन सुरक्षित रहाणे बाबत नागरिकांना आवाहन केले. कोणत्याही आमिषाला बळी पडुन नका, कोणताही अननोन नंबर हा फ्राॅड असु शकतो. अशा अननोन नंबरपासुन सावध रहा अशा सुचना यावेळी केल्या.

यावेळी सायबर क्राईम विषयी घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत पथनाट्य सादर करण्यात आले. या पथनाट्याची कथा, लेखन आणि दिग्दर्शन चौहान यांनी केले. तर वेंगुर्ला होमिओपॅथीक मेडीकल काॅलेजमधील विद्यार्थ्यांनी त्यांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. त्यांचे पोलीस अधीक्षकानी सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन कौतुक केले. तसेच शिरोडा अ.वि.बावडेकर विद्यालय व गोगटे काॅलेज येथील विद्यार्थ्यांच्या चित्रकला, निबंध स्पर्धा घेवून त्याचे प्रदर्शन ठेवून सहभागी विद्यार्थ्यांच्या कलागुणाचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंखे, कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळी, सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक संदीप भोसले, वेंगुर्ले चे पोलीस निरीक्षक अतुल जाधव, शिरोडा सरपंच लतिका रेडकर, मोचेमाड सरपंच स्वप्नेशा पालव, शिरोडा ग्रा. प. सदस्य हेतल गावडे, रश्मी डीचोलकर, माजी सदस्य आजू अमरे, पं स माजी सभापती जगन्नाथ डोंगरे, आरवली देवस्थानचे अध्यक्ष जयवंत राय, आरवली पोलीस पाटील मधुसूदन मेस्त्री, यांच्यासाहित पोलिस अधिकारी, कर्मचारी, नागरिक, पर्यटक उपस्थित होते. पोलीस बॅंड पथकाने “चलते चलते मेरे ये गीत” “याद रखना” या संगीताने कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काका सावंत तर आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा