– अपर जिल्हादंडाधिकारी
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील ज्या शस्त्र परवाना धारकांच्या परवान्याची मुदत 31 डिसेंबर 2020 रोजी संपत आहे, अशा शस्त्र परवाना धारकांनी शस्त्रे परवाने नुतनीकरणासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग याच्या सिंधुदुर्गनगरी येथे असलेल्या सेतू सुविधा केंद्रात दुपारी 1.00 वाजेपर्यत विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत, असे असे आवाहन अपरजिल्हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
शस्त्र परवाना नुतनीकरणासाठी एकाच दिवशी गर्दी होऊ नये म्हणून परवाने नुतनीकरणासाठी तालुकानिहाय तारखा ठरवून देण्यात आल्या आहेत. त्या तारखांनाच संबंधित तालुक्यातील शस्त्र परवाना धारकांनी शस्त्र परवान्यासह उपस्थित रहावे. शस्त्र परवाना नुतनीकरणासाठी तालुकानिहाय तारखा पुढील प्रमाणे :- सावंतवाडी दि. 1,2 व 3 डिसेंबर 2020, दोडामार्ग दि. 7 व 8 डिसेंबर 2020, मालवण दि. 10 व 11 डिसेंबर 2020,कणकवली दि. 14 व 15 डिसेंबर 2020, कुडाळ दि. 17 व 18 डिसेंबर 2020 , देवगड दि. 21,22 व 23 डिसेंबर 2020, वैभववाडी दि. 28 व 29 डिसेंबर 2020 , वेंगुर्ला दि. 30 व 31 डिसेंबर 2020,
शस्त्र परवाना नुतनीकरणासाठी पुढील प्रमाणे कागदपत्र सादर करावीत : 1) परवाना क्रमांक, शस्त्राचा प्रकार व क्रमांक लिहून नूतनीकरणासाठी विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा. 2) मुळ शस्त्र परवाना अर्जासोबत जोडावा 3) शस्त्र पडताळणी केल्याबाबतचे संबंधित पोलीस ठाणे यांच्याकडील प्रमाणपत्र 4) परवानाधारक हयात असल्याबाबतचा सरपंच, पोलीस पाटील, नगराध्यक्ष याच्याकडील दाखला 5) परवानाधारक सैनिक, माजी सैनिक असल्यास याबाबतचा पुरावा सोबत जोडावा 6) परवाना नुतनीकरण हे पाच (05) वर्षाकरीता असणार असल्याने, प्रतिवर्ष 500 रुपये याप्रमाणे 5 वर्षाकरीता 2 हजार 500 रुपये फी शासन जमा करणे आवश्यक आहे.
शस्त्र परवाना नुतनीकरणाचे अर्ज पोस्टाव्दारे किंवा तालुक्याच्या ठिकाणी स्विकारले जाणार नाहीत. तसेच नुतनीकरण झालेले शस्त्र परवाने पोस्टाने पाठविले जाणार नाहीत. तरी संबंधितानी विहित वेळेत आपले शस्त्र परवाने नुतनीकरण करुन घ्यावेत, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.