You are currently viewing सबकुछ मधुसूदन:नाबाद 76376

सबकुछ मधुसूदन:नाबाद 76376

*डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी जिंकली बाळांची एक संध्याकाळ !*

पुणे:

11एप्रिल2923: आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या साहित्यिक आणि वसुधा क्रिएशनच्या अध्यक्षा वसुधा नाईक
यांनी लायन ऑफ दि वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेकर्स ॲवाॅर्ड विनर विश्वविक्रमवीर डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा सबकुछ मधुसूदन हा एकपात्री कार्यक्रम नुकताच एका संध्याकाळी आयोजित केला होता…खास बाळांसाठी आणि डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या एकपात्री कार्यक्रमाचा तब्बल 76376 वा प्रयोग होता.
या कार्यक्रमाचे संयोजन कोमल नाईक, सचिव वैभव नाईक आणि संगीता उंबरदंड यांनी केले. या कार्यक्रमास काही शालेय विद्यार्थ्यांसोबत पालक मंडळी तसेच भारतीय जनता पार्टी-ज्येष्ठ नागरिक आघाडी-पुणे शहर पद्मावती विभाग अध्यक्षा स्वाती दिवाण उपस्थित होते. खास बाळांसाठी सबकुछ मधुसूदन हा एकपात्री कार्यक्रम करुन डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी आणखी एका विश्वविक्रमाची भर घातली. बाळांच्या
हस्ताक्षरावरून मिष्किल-सकारात्मक
स्वभावदर्शन, शिट्टीवर बालगीते, रिमझिम पावसाचे गाणे, विनोदी किश्श्यांचा हसा हसा आविष्कार, विनोदी पाढे, बोलके प्राणी. पक्षी तसेच बोलकी बाहुली, हसण्याचे, रडण्याचे प्रकार असे बहुरंगी बहुरंगी कार्यक्रम सादर करुन डाॅ.घाणेकर
यांनी बाळांची एक संध्याकाळ सहजपणे जिंकून घेतली. कार्यक्रमाचे औचित्य साधून डाॅ.घाणेकर संपादित 417 व्या विश्वविक्रमी डहाळी अंकाचे प्रकाशन समारंभ अध्यक्ष वसुधा नाईक आणि काही बाल रसिकांच्या
शुभहस्ते करण्यात आले. गोड बोलणा-या सुमारे 25 बाळांना डाॅ.घाणेकर यांनी मिठू मिठू पोपट ॲवाॅर्ड दिले तर हस-या पालकांना हाहाहाsssलाफ इंटरनॅशनल
ॲवार्ड प्रदान केले. वसुधा क्रिएशन तसेच राष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थान यांच्यातर्फे डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा
जाहिर सत्कार करण्यात आला.
वसुधा नाईक यांनी आपल्या अध्यक्षीय
भाषणात डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या
गेल्या ६० वर्षाच्या झंजावाती यशस्वी
वाटचालीवर प्रकाशझोत टाकला.
” डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचे सबकुछ मधुसूदनचे चालते, बोलते, हिंडते, फिरते अनेक प्रयोग मी पाहिले आहेत. हृदयविकार, कोरोना यासारख्या
गंभीर आजारांना इच्छाशक्तीच्या बळावर सत्तरीच्या उंबरठ्यावर असणारा हा कलावंत आजही जिथे रसिक भेटेल तिथे त्याचे निरपेक्ष मनोरंजन करीत आहे.
रंगभूमीच्या विश्वात व्यासपीठाची व्याख्याच बदलून टाकणारा हा एकमेव क्रांतिकारक एकपात्री कलावंतच म्हणावा लागेल. गेल्या साठ वर्षांहून अधिक काळ रोजच भेटणा-या अगणित रसिकांचे सातत्याने मनोरंजन करीत असल्याने डाॅ.घाणेकर यांनी आगामी काही वर्षात आपल्या प्रयोगांची संख्या लाखांपर्यंत नेऊन पोचवली तर या रंगकर्मीची दैदीप्यमान कर्तृत्वाचा आणखी एक विश्वविक्रम होईल आणि तो विश्वविक्रम
मोडायला किमान हजारो वर्ष लागतील.” या शब्दात वसुधा नाईक यांनी डाॅ.घाणेकर यांचा गौरव केला.
डाॅ.घाणेकर यांनी हा 76376 वा प्रयोग त्यांच्या कार्यक्रमाच्या सर्व रसिक साक्षीदारांना कृतज्ञतापूर्वक समर्पित केला.

 

*संवाद मिडिया*

*गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या हक्काचे घर बुक करा*

*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*

*1 BHK & 2 BHK फ्लॅट्स*

*🏤”दर्पण कन्स्ट्रक्शन”*
*🏚️सावंतवाडी🌳*

*घेऊन आले आहेत…! अगदी 🏞️नरेंद्र डोंगराच्या🌳 कुशीत…! प्रसिद्ध माठेवाडा🛕 परिसरात*

*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*

*📲 अधिक माहितीसाठी संपर्क साधा :-*👇
*9890968845 / +918379896943*

*🏠ऑफिस :- 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग*

*🌐Advt Web link*

———————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा