वैभववाडी :
आज करुळ व भुईबावडा परिसरात अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांची एकच तारांबळ उडाली. या अवकाळी पावसाचा फटका आंबा, काजू बागायतरांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.
आज सायंकाळी करुळ व भुईबावडा परिसरात सह्याद्री पट्ट्यात अचानक पावसाने जोरदार हजेरी लावली. तालुक्याच्या इतर भागाप्रमाणे करूळ व भुईबावडा परिसरात मोठ्याप्रमाणे शेतकऱ्यांनी काजू लागवड केली आहे. यावर्षी काजूला चांगला दर नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. त्यातच अवकाळी पाऊस पडलेल्या पावसामुळे शेतकरी आणखी अडचणीत सापडला आहे.