You are currently viewing स्थानिक अन्वेषण शाखेने मोबाईल व सोने चोरास केले जेरबंद           

स्थानिक अन्वेषण शाखेने मोबाईल व सोने चोरास केले जेरबंद           

सिंधुदुर्गनगरी

बांदा पोलीस ठाणे गुरनं. 38/2022, भा.दं.वि. कलम 379 या गुन्ह्यात फिर्यादी अक्षय अशोक देसाई, रा. शिरवल ता. दोडामार्ग यांचा 6,000/- रुपये किंमतीचा मोबाईल हॅन्डसेट बिलेवाडी, इन्सुली येथून चोरीस गेलेबाबत दि. 22.05.2022 रोजी गुन्हा दाखल आहे. त्याचप्रमाणे मालवण पोलीस ठाणे गु.र.नं. 114/2022 भा.दं.वि. कलम 379 गुन्ह्यात फिर्यादी सुनिल गंगाराम परब, रा.काळसे, भंडारवाडी यांचा 4,500/- रुपये किंमतीचा मोबाईल हॅन्डसेट चोरीस गेलेबाबत दि.26.07.2022 रोजी गुन्हा दाखल आहे. दोन्ही गुन्ह्यात चोरीस गेलेले मोबाईल व अज्ञात चोरट्यांच्या शोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची टिम होती. मुदतीत मोबाईल चोरून नेणाऱ्या इसमास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या टिमने निष्पन्न करून बांदा पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यातील मोबाईल चोरणाऱ्या इसमास बांदा येथून व मालवण पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यातील मोबाईल चोरणाऱ्या इसमास कुडाळ येथून दि. 06.04.2023 रोजी ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींकडून चोरीस गेलेले दोन्ही मोबाईल हस्तगत करुन गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदिप भोसले आणि महेंद्र घाग, सपोनि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहा. पोलीस उपनिरीक्षक गुरुनाथ कोयंडे, पोलीस हवालदार किरण देसाई व प्रथमेश गावडे यांनी केलेली आहे.

कुडाळ पोलीस ठाणे गु.र.नं. 145/2022, भा.दं.वि. कलम 328, 379, 34 या गुन्ह्यातील फिर्यादी रिक्षाचालक राजेश गणपत सावंत रा. तळगांव, ता. मालवण यांनी एक अनोळखी पुरुष व एक अनोळखी स्त्री यांचे भाडे पिंगुळी, मठ येथे नेलेले होते. सदर ठिकाणी फिर्यादीला त्या इसमांनी देवाचा प्रसाद म्हणून मिठाई खाण्यासाठी दिली. ती खाल्ल्यामूळे फिर्यादी यांना गुंगी आली. याचा फायदा घेवून त्यांनी फिर्यादीची सोन्याची चैन, रोख रक्कम असा एकुण 87,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेलेला असल्याने दि. 28.08.2022 रोजी गुन्हा दाखल आहे. त्याच प्रकारचा गुन्हा देवगड पोलीस ठाणे हद्दीत दि. 26.09.2022 रोजी घडलेला असून त्यामध्ये फिर्यादी यांची सोन्याची चैन, अंगठ्या, घड्याळ व रोख रक्कम असा एकुण 84,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याबाबत देवगड पोलीस ठाणे गु.र.नं. 80/2022, भा.दं.वि. कलम 328, 379, 34 प्रमाणे दि. 28.09.2022 रोजी गुन्हा दाखल आहे.

 

सदर अज्ञात चोरट्यांचा शोध स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कुडाळ व देवगड पोलीस ठाणे करीत होते. सदर गुन्ह्यामध्ये संयुक्तिक तपास कामातून आरोपी हा गुजरात येथील असल्याचे निष्पन्न करून कुडाळ पोलीस ठाणेच्या सपोनि एम. डी. पाटील, पोना/ तांबे, पोना/ सारंग यांनी अहमदाबाद, गुजरात येथे  जावून  आरोपीस ताब्यात घेवून त्याचेकडून कुडाळ पोलीस ठाणे गु.र.नं. 145/2022 मधील चोरीस गेलेले सोन्यापैकी 19 ग्रॅम सोने जावून आरोपीस व देवगड पोलीस ठाणे गु.र.नं. 80/2022 मधील चोरीस गेलेले सोन्यापैकी 26 ग्रॅम सोने हस्तगत करुन जप्त केले व दोन्ही गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, व अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक  एस. पी. चिंदरकर, कुडाळ पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. एम. डी. पाटील, पोलीस नाईक  श्री.तांबे, श्री. सारंग यांनी केलेली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा