वेंगुर्ला :
वेंगुर्ला तालुक्यातील नवाबाग समुद्रकिनारी सुमारे ६० वर्षीय एका अनोळखी महिलेचा मृतदेह दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नवाबाग ग्रामस्थांना समुद्रात तरंगताना हा मृतदेह आढळून आला,. तेथील रहिवासी निलेश खडपकर यांनी याची कल्पना वेंगुर्ला पोलीस स्टेशनला दिली. पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार योगेश वेंगुर्लेकर व अनुराधा देसाई यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तो मृतदेह समुद्राच्या पाण्यातून बाहेर काढला. त्यावेळी उपनिरीक्षक विनायक केसरकर हे उपस्थित होते. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला असून पुढील तपास तपासी अमलदार योगेश वेंगुर्लेकर करीत आहेत.