आ.नितेश राणेंच्या माध्यमातून गरजू शालेय विद्यार्थ्यांना १२० सायकल केंद्रीय मंत्री नारायण राणे हस्ते वाटप..
कणकवली
केंद्रीय मंत्री तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी हजारो कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली आहे.राज्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी या ठिकाणी ना. नारायण राणे यांना भेटून प्रत्यक्ष शुभेच्छा दिल्या.त्यामुळे ओम गणेश निवासस्थानी मोठ्या संख्येने गर्दी झाली आहे.तसेच आ.नितेश राणेंच्या माध्यमातून गरजू मुलींना १२० सायकल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रदान करण्यात आल्या.
यावेळी आ.नितेश राणे,निलमताई राणे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत, संजना सावंत,नगराध्यक्ष समीर नलावडे,उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,तालुकाध्यक्ष संतोष कानडे,मिलिंद मेस्त्री,सरचिटणीस मनोज रावराणे,बँक संचालक विठ्ठल देसाई,बँक संचालिका प्रज्ञा ढवण,नगरसेविका मेघा गांगण,हर्षदा वाळके,दीपलक्ष्मी पडते,संदीप मेस्त्री, बाळ खडपे,अमोल तेली,खरेदी विक्री संघ चेअरमन प्रकाश सावंत,शहराध्यक्ष अण्णा कोदे आदीसह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.