You are currently viewing शिवसेना ठाकरे गटातर्फे ठाण्यात आरोग्य शिबिर संपन्न

शिवसेना ठाकरे गटातर्फे ठाण्यात आरोग्य शिबिर संपन्न

शिवसेना ठाकरे गटातर्फे ठाण्यात आरोग्य शिबिर संपन्न

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून ठाणे-कळवा-खारेगाव-पारसिकनगर मधील विभाग संघटीका सौ. कल्पनाताई कवळे यांनी हिरादेवी महिला मंडळच्या माध्यमातून महिलांसाठी आयोजित केलेल्या स्तनाचा कर्करोग तपासणी आणि त्यावर निदान तसेच नेत्ररोग तपासणी, मोफत चष्मा वाटप शिबिर आयोजित केले होते. सदर कार्यक्रम “सेंटर फॉर साईट” आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहकार्याने आयोजित केला होता.
या सामाजिक उपक्रमाला लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशन, ट्रेड युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.प्रशांत अशोकराव खानविलकर आणि महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री.विशाल गवई यांनी उपस्थिती लावून त्यांचा आदर सत्कार करण्यात आला. तसेच शिवसेना उपनेत्या सौ.ज्योती ताई ठाकरे यांनी छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले आणि कार्यक्रमाची सुरुवात केली. सदर कार्यक्रमाला शिवसेना संपर्क संघटीका मृणालताई यज्ञेश्वर, उपजिल्हाप्रमुख विजयजी देसाई, शहरप्रमुख चंद्रकांतजी विधाटे, विभागप्रमुख दुर्योधन फडतरेजी, लहूजी चाळके, वैभवजी शिरोडकर, राजू शिंदेजी, श्रीकांतजी मोरे आणि संतोषजी कवळे या सर्वांनी विशेष परिश्रम घेतलेल्या या आरोग्य शिबीरात महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवत मोठ्या संख्येने लाभ घेतला.
सदर शिबीरास शिवसेना ठाणे जिल्हा संघटीका समिधाताई मोहिते, शहरप्रमुख प्रदीपजी शिंदे, कल्याण लोकसभा जिल्हा संघटक कविताताई गावंड, उपजिल्हा संघटक वैशाली दरेकर, नमिताताई सावंत, सायली साळवी, अमृता पवार, शिल्पा सावरटकर, रणिता राजपकर, निलिमाताई शिंदे, छायाताई आरमृगम, राष्ट्रवादीच्या रूताताई आव्हाड, अभिजीतजी पवार, अर्जूनजी पाटील, महेश पाटील, प्रविण केदारे, समीर भगत, सुरेखाताई पाटील तसेच वंचित आघाडीचे डॅा.शशिकांत शिंदे, श्री शाम पडतेजी यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी भेट दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा