You are currently viewing महिलांनी स्वतःचे कर्तुत्व सिद्ध करावे- उद्योजक सुनील नारकर

महिलांनी स्वतःचे कर्तुत्व सिद्ध करावे- उद्योजक सुनील नारकर

भुईबावडा येथे स्पर्शिका चषक 2023 स्पर्धांचे उद्घाटन

वैभववाडी

समाजामध्ये महिलांचे स्थान अधिक बळकट झाले आहे. महिलांनी स्वतःला मागे न ठेवता आपली स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी धडपड करणे आवश्यक आहे. चूल आणि मूल याकरिता सिमेट न राहता महिलांनी पुढे यावे असे आवाहन उद्योजक सुनील नारकर यांनी केले आहे. समाजसेवक उद्योजक सुनील नारकर यांच्या वाढदिवसानिमित्त गेली दोन दिवस विविध सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाचे आयोजन भूईबावडा नारकरवाडी करण्यात आले आहे. या सांस्कृतिक महोत्सवामध्ये खेळ पैठणीचा कार्यक्रमाच्या उद्घाटन वेळी ते बोलत होते.

यावेळी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा क्रिकेट स्पर्धा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी भुईबावडा सरपंच बाजीराव मोरे, अकोबा मोरे, मनोहर मोरे, तानाजी मोरे, बाळू मोरे, अरुण मोरे, गजानन मोरे, अनिल पावले, सदा मोरे, बाळकृष्ण मोरे, अनिल देसाई, रामदास घुगरे, रमेश मोरे, सदानंद मोरे, अशोक नारकर, शरद नारकर, श्रीधर मोरे, संदीप परटवलकर, दीपक सावर्डेकर, संदेश तुळसणकर तसेच मोठ्या संख्येने महिला वर्ग क्रिकेट प्रेमी कबड्डी स्पर्धक व प्रेक्षक उपस्थित होते.

दरवर्षीप्रमाणे सुनील नारकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न होतो. पार पडणाऱ्या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे असे आव्हान देखील श्री नारकर यांनी केले आहे. यावेळी भुईबावडा सरपंच बाजीराव मोरे यांनी मनोगत व्यक्त केले सुनील नारकर यांनी आपल्या सामाजिक कार्यातून आपली स्वतःची ओळख निर्माण करत आहे भुईबावडा पंचक्रोशी मध्ये त्यांचा बुलंद आवाज उल्लेखनीय आहे. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा तसेच इतर स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत सरपंच श्री मोरे यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा