*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य तथा अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि.ग.सातपुते लिखित अप्रतिम लेख*
*कलासक्त कलाकार*
******************
*कला हे कलाकाराचे विनासक्त* *तृप्त समाधानी जगणेअसते . *आणि त्यातच भौतिक क्षणिक सुखसौख्याच्याही पल्याड असणारा *ब्रम्हस्वरूप निरागस आनंद* असतो…!!
त्रैलोक्यातील अंशात्मक अणुरेणु देखील कलासक्त व्यक्तिमत्वाची ऊर्जा / प्रेरणादायी चैतन्यस्त्रोत आहेत.
ज्या अनामिक शक्तिने ही विविधांगी , विलक्षण जीवसृष्टि निर्माण केली तो तर एक महान कलाकारच आहे असेच म्हणावे लागेल . त्याने चराचरातील प्रत्येक आत्म्याला सर्वार्थ सुंदरतेने नटवून अतर्क्य अशी किमया केली आहे.
सर्वच जीवाआत्म्याचे रंग , रूप , प्रेम भावनां , सुख , दुःख , विरह , आनंद , स्वार्थ , क्रोध , अशा साऱ्या संवेदनांच्या छटा निर्माण करून कलासक्त जीवाला भावनात्मक अशा वैश्विक साहित्य , सर्वच कला , संस्कृतीला अनुसरुन कलानिर्मिती साठी एक प्रकारचे आव्हानच केले आहे..
म्हणूनच त्या आव्हानांना सामोरे जावून किंवा ते आव्हान विवेकाने पेलून प्रांजळ कलाकृती निर्माण करून भावनाविष्कारांना न्याय देणारा *कलासक्त कलाकार* मग तो कुठल्याही क्षेत्रातील असो तो सर्वसामान्य माणसापेक्षा निश्चितच वेगळा आहे. हे निर्विवाद ..!!
*भाग्यवंत आहे..!!*
कुठलीही कला ही आत्मिक आनंद देते. त्या आनंदाची तुलना या जगातील कुठल्याच मौजमापदंडांनी कधीच करता येत नसते. हे वास्तव आहे.
*गर्भातुन नैसर्गिक प्रसवणारा जीवात्मा आणि त्यातून प्राप्त होणारा सात्विक मातृत्वी , पितृत्वी वात्सल्यप्रीतानंद जो आहे तो अवर्णनीय , शब्दातीत आहे हे निर्विवाद..!!*
*तसेच कुठल्याही कलेची उपासना किंवा त्यातील आत्मतादात्म्यातुन* *जन्माला येणारी कलासक्त कलाकाराची उत्कट कलाकृती म्हणजे ब्रह्मानंद आहे.*
*कृपाळू दैवदान आहे..*
*देवकृपा आहे असे मी म्हणेन.*
*कला ही साधना , तपश्चर्या आहे.*
*आणि अशा कलेतुन झालेली निर्मिती ही तनमनांतराला मंत्रमुग्ध करणारी असते.*
*म्हणूनच कला हे व्रतस्थ जगणे असून कलाकार साधक आहे.*
*आणि अशा प्रांजळ कलासक्त कला साधनेची स्वानुभुती म्हणजे आत्मिक मोक्षमुक्ती लाभणारी जीवनाची सुखद सांगता आहे.*
आणि म्हणूनच भौतिक कोलाहलात देखील त्या कृपाळू मुरलीमनोहराच्या मुग्ध पावरीचे मधुर स्वर चित्ताला वात्सल्यतेने कुरवाळत रहातात. आणि निर्व्याज कलासक्त जीवनाचा अर्थ उलगड़तो , प्रत्ययास येतो..
म्हणूनच असा *कलासक्त* जीवनाचा ध्यास असणे , लाभणे हे जन्मोजन्मीचे तृप्त कृतार्थी संचित आहे. ते आपण कलाकाराने अंतिम श्वासापर्यंत जपत रहावे..!!!
*इती लेखन सीमा…*
******************
*वि.ग सातपुते*
अध्यक्ष : महाकवि कालिदास प्रतिष्ठान.
पुणे , मुंबई , ठाणे , मराठवाड़ा ( महाराष्ट्र)
*📞(9766544908 )*