You are currently viewing सातार्डा माई सभागृह येथे रक्तदान शिबिर संपन्न

सातार्डा माई सभागृह येथे रक्तदान शिबिर संपन्न

रक्तदान शिबिरात ५५ रक्तदात्यांच्या सहभाग; केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

 

सावंतवाडी :

 

सातार्डा येथील “माई सभागृह” येथे रविवारी भाजपा आरोंदा जि. प. मतदार संघ व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या ७१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ५५ जणांनी रक्तदान केले.

सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी सभापती सौ. शर्वाणी शेखर गांवकर, शेखर गांवकर, सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानचे सावंतवाडी – दोडामार्ग तालुका विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर, भाजपचे बांदा मंडल उपाध्यक्ष झिलू राऊळ, शक्तीकेंद्रप्रमुख रवींद्र धुपकर, कवठणी सरपंच अजित कवठणकर, किनळे सरपंच दीपक नाईक, तळवणे सरपंच समीर केरकर, कास सरपंच प्रवीण पंडित, आपा पारिपत्ये, मडूरा उपसरपंच बाळू गावडे, आबा सातोसकर, ज्ञानेश्वर मांजरेकर, शेखर प्रभू, उदय सातार्डेकर आदी पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते. संदीप नेमळेकर,भाजपचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेश धुरी यांनीही रक्तदान केले.

यावेळी एसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाईफलाईन हॉस्पिटल व जिल्हा रुग्णालय यांनी सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा