You are currently viewing दोनशे कोटी रुपयाचे टेक्निकल सेंटर लवकरच सिंधुदुर्गात सुरू होणार ; केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे

दोनशे कोटी रुपयाचे टेक्निकल सेंटर लवकरच सिंधुदुर्गात सुरू होणार ; केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे

कोकणातील पहिले शासनमान्य कोकण भूमी टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्युबेशन फाऊंडेशन सेंटरचे झाले उदघाटन

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना उद्योजक म्हणून घडवण्यासाठी ज्या ज्या शिक्षणाची अपेक्षा आहे ते प्रत्येक प्रशिक्षण सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिले जाईल. त्यासाठी दोनशे कोटी रुपयाचे टेक्निकल सेंटर लवकरच सिंधुदुर्गात सुरू केले जाणार आहे. चांगले प्रशिक्षण घेऊन उच्च प्रतीच्या नोकऱ्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मिळविण्याची क्षमता येथील तरुण-तरुणींमध्ये निर्माण होईल अशा पद्धतीचे प्रयत्न माझे सुरू आहेत.लवकरच पाचशे एकर क्षेत्रात आधुनिक टेक्नॉलॉजी असले मोठी इंडस्ट्रीज सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणत आहे अशी माहिती केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केली.

कोकणातील पहिले शासनमान्य कोकण भूमी टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्युबेशन फाऊंडेशन सेंटरचे केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या शुभहस्ते उदघाटन झाले. यावेळी एसएसपीएम संस्थेच्या अध्यक्षा सौ. निलम ताई राणे, सचिव नितेश राणे, सदस्य श्रीमती. प्रगती नरे, कोकण भुमी टेक्नॉलॉजी इनक्युबेशन सेंटरचे डायरेक्टर श्री. अभिषेक तेंडुलकर व सौ. आसावरी राजोपाध्ये, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ. अनिश गांगल , प्रशासकीय अधिकारी श्री. शांतेश रावराणे सर्व कर्मचारी व विद्यार्थी ऊपस्थितीत होते.उदघाटन प्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले विकासाच्या बाबतीत मी नेहमीच आग्रही आहे आणि म्हणूनच कणकवली दोन वेळा माझ्या सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून उद्योग प्रशिक्षण आणि प्रदर्शन कार्यक्रम घेतल्या नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 350 तरुण-तरुणींनी उद्योजक होण्यासाठी प्रस्ताव सादर केले सकारात्मक दृष्टीने काम केल्यास असे यश आणखीन मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा