सावंतवाडी
येथील सालईवाडा भागात राहणाऱ्या युवकाचे दुर्धर आजाराने निधन झाले. सिल्वेस्टर सॅबी राॅड्रीक्स (वय २७) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर गोवा-बांबुळी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या पश्चात आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. सिल्वेस्टर हा मनमिळावू होता. त्याचा मित्रपरिवार मोठा होता. त्यामुळे त्याच्या जाण्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. गेले महिनाभर तो आजारी होता.