पोलीस तपास सुरु ; काही जण चौकशीसाठी ताब्यात ?
मालवण
चौके – कसाल महामार्गावर चौके नजिक शनिवारी सायंकाळी उशिरा झालेल्या झालेल्या मारहाणीत दीपक गेंडे नामक कासाराचा मृत्यू झाल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसानी काहीजणांना ताब्यात घेतल्याचे समजते. चौके येथे कासाराचे काम करणारा मृत इसम हा कणकवली बोर्डवेचा रहिवाशी होता. तो कट्टा येथे वास्तव्यास होता, अशी माहिती मिळत आहे.
शनिवारी सायंकाळी उशीरा त्याला तीन ते चार युवकांकडून गंभीर मारहाण झाली. त्याला कणकवलीत उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.