You are currently viewing दिल्लीला हरवून राजस्थान गुणतक्त्यात अव्वल, बटलर आणि जैस्वाल चमकले, वॉर्नरचे अर्धशतक व्य

दिल्लीला हरवून राजस्थान गुणतक्त्यात अव्वल, बटलर आणि जैस्वाल चमकले, वॉर्नरचे अर्धशतक व्य

*दिल्लीला हरवून राजस्थान गुणतक्त्यात अव्वल, बटलर आणि जैस्वाल चमकले, वॉर्नरचे अर्धशतक व्यर्थ*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

आयपीएल २०२३च्या ११व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने शनिवारी दिल्ली कॅपिटल्सचा ५७ धावांनी पराभव करून तीन सामन्यांमध्ये आपला दुसरा विजय नोंदवला, तर दिल्लीचा हा सलग तिसरा पराभव आहे. राजस्थानने चार गड्यांच्या मोबदल्यात १९९ धावा केल्या तर दिल्लीचा संघ नऊ गड्यांच्या मोबदल्यात १४२ धावाच करू शकला. कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ६५ धावांची खेळी खेळली, पण त्याला दुसऱ्या टोकाला साथ मिळाली नाही आणि संघाला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. वॉर्नरनंतर ललित यादवने सर्वाधिक ३८ धावांची खेळी केली.

दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, तर त्याला राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर (७९ धावा) आणि सामनावीर यशस्वी जैस्वाल (६० धावा) यांच्या क्षमतेची चाचणी होती. हा निर्णय दिल्लीलाच महागात पडला. राजस्थानच्या सलामीच्या जोडीने ९८ धावांची भागीदारी करून दिल्लीला सामन्यात खूप मागे टाकले होते.

दिल्लीला पहिल्या सामन्यात लखनौकडून पराभव पत्करावा लागला होता आणि त्यानंतर त्यांच्या घरच्या मैदानावर गुजरातविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर राजस्थानचे सलामीवीर जोस बटलर (७९ धावा) आणि यशस्वी जैस्वाल (६०) यांनी पहिल्या विकेटसाठी ८.३ षटकांत ९८ धावांची भागीदारी करून संघाला दमदार सुरुवात करून दिली. यशस्वीने ३१ चेंडूंच्या खेळीत ११ चौकार आणि १ षटकार लगावला. एव्हरग्रीन बटलरने ५१ चेंडूंच्या खेळीत ११ चौकार आणि १ षटकार लगावला. गेल्या सामन्यात बोटाच्या दुखापतीचा परिणाम बटलरच्या खेळीवर दिसून आला नाही. यशस्वी आणि बटलर या दोघांनाही मुकेश कुमारने (२/३६) त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले. हेटमायरने २१ चेंडूत नाबाद ३९ धावा केल्या. बार्सपारा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात राजस्थानच्या डावात २३ चौकार आणि सात षटकार होते तर दिल्लीच्या संपूर्ण डावात एकही षटकार दिसला नाही.

खलील अहमदच्या दोन षटकांत यशस्वीने ३१ धावा कुटल्या. डावाच्या पहिल्याच षटकात त्याने पाच चौकार मारले. यशस्वीने २५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, जे त्याचे आयपीएलमधील एकूण पाचवे अर्धशतक होते. जैस्वालने आपल्या ३१ चेंडूंच्या खेळीने राजस्थानच्या मजबूत धावसंख्येचा पाया रचला. त्यानंतर बटलरने आक्रमक वृत्ती दाखवली. पहिल्या सहा षटकांत राजस्थानने १४ चौकारांसह एकही विकेट न गमावता ६८ धावा केल्या. नंतर कुलदीप यादव (१/३१), मुकेश कुमार (२/३६) आणि रोवमन पॉवेल (१/१८, दोन षटकं) यांनी चेन्नईला २०० धावांचा टप्पा पार करण्यापासून रोखले. एनरिच नॉर्टजेने चार षटकांत ४४ धावा दिल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना, ट्रेंट बोल्टने (३/२९) पृथ्वी शॉ आणि मनीष पांडे यांना पहिल्याच षटकात खाते न उघडता बाद केल्याने दिल्ली संघाला लवकर धक्का बसला. संघाने धावा न करता दोन विकेट गमावल्या होत्या. पृथ्वी शॉ विकेटच्या मागे झेलबाद झाला तर मनीष पांडे पायचीत झाला. पृथ्वीने तीन सामन्यांमध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारे विकेट गमावल्या आहेत. अशा खराब सुरुवातीनंतर दिल्ली संघाला सावरता आले नाही. कर्णधार वॉर्नरने तीन सामन्यांत आपले दुसरे अर्धशतक झळकावले पण ते व्यर्थ गेले. बोल्टने दुसऱ्या स्पेलमध्ये ललित यादवच्या रूपाने तिसरी विकेट घेतली.

 

*संवाद मिडिया*

*गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या हक्काचे घर बुक करा*

*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*

*1 BHK & 2 BHK फ्लॅट्स*

*🏤”दर्पण कन्स्ट्रक्शन”*
*🏚️सावंतवाडी🌳*

*घेऊन आले आहेत…! अगदी 🏞️नरेंद्र डोंगराच्या🌳 कुशीत…! प्रसिद्ध माठेवाडा🛕 परिसरात*

*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*

*📲 अधिक माहितीसाठी संपर्क साधा :-*👇
*9890968845 / +918379896943*

*🏠ऑफिस :- 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग*

*🌐Advt Web link*

———————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा