शेतकरी तसेच व्यापारी वर्गाचे अतोनात नुकसान
फोंडाघाट
फोंडाघाट वासीयांना आज तुफान पावसाने झोडपून काढले. सुमारे १ तास पाऊस पडत होता.बाजारातील रस्ता रुंदीकरणामुळे दुकानांचे तोडकाम केलेले असलेने बऱ्याच दुकानात झडीचे पाणी आले. आज झालेल्या पावसाने आंबा काजुचे बरेच नुकसान झाले. सलग ३ दिवस सुट्टी असल्याने शासकीय अधिकारीही उपलब्ध होऊ शकले नाहीत. अधिकारी उपलब्ध नसल्याने पंचनाम्याशिवाय नुकसान भरपाई कशी मिळणार या विवंचनेत शेतकरी आहे. आज झालेल्या पावसाने झालेल्या नुकसानीची माहिती नुकसान ग्रस्त शेतकरी तसेच व्यापारी वर्ग आमदार नितेशजी राणेंना यांना देणार आहेत. आज पडलेल्या तुफान पावसामुळे फोंडाघाट मध्ये काय परिस्थिती उद्भवली याचा पाठपुरावा आमदार नितेश राणेच करू शकतात व नुकसानग्रस्तांना न्याय मिळवून देतील असा विश्वास फोंडाघाट वासियांना आहे असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे व्यक्त केला आहे.