You are currently viewing केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सातार्डा येथे भाजपा आरोंदा जि प मतदार संघाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सातार्डा येथे भाजपा आरोंदा जि प मतदार संघाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

बांदा

सातार्डा येथे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या ७१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा आरोंदा जि प मतदार संघ व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार दि.९ एप्रिल २०२३ रोजी “माई सभागृह” येथे करण्यात आले आहे.या रक्तदान शिबिराला मोठया संख्येने रक्तदात्यांनी सहभागी होऊन शिबीर यशस्वी करावे असे आवाहन भाजपा आरोंदा जि प मतदार संघाच्या वतीने करण्यात येत आहे.
यावेळी दुर्मिळ अशा बॉम्बे ब्लड ग्रुपच्या रक्तगटाची तपासणीही या शिबिरात घेण्यात येणार आहे.विशेष म्हणजे या रक्तगटाची जगातील ८०० कोटी लोकसंख्येपैकी जवळपास ४५० व्यक्तींमध्ये हा रक्तगट आढळून आला आहे,त्यात सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानच्या शोधमोहीमेमुळे आतापर्यंत एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६ व्यक्तींमध्ये हा रक्तगट शोधण्यास यश मिळाले आहे. त्यातील तिघेजण ऑन कॉल डोनर आहेत.बॉम्बे ब्लड ग्रुप हा ओ रक्तगटाच्या व्यक्तीत आढळतो त्यामुळे ओ पॉझिटिव्ह व निगेटिव्ह रक्तगटाच्या व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे.
इच्छुक रक्तदात्यांनी गोविंद मांजरेकर (८३२९५५६०९५),आबा सातोसकर (९४२१२६२६६७),उमेश शेट्ये (9405318007),साई कवठणकर(8208104719) ,सिद्धेश कांबळी (9405299564),रवींद्र धुपकर (9960711956)रुपेश साळगावकर (९८२३८४१२८४),यश माधव (८३६९५३९७६९) यांच्याशी संपर्क साधला असे आवाहन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा