You are currently viewing शहाणपणाचं ओझं

शहाणपणाचं ओझं

*”सरलसुधा” या टोपण नावाने लिहिणारे नवोदित कवी तुषार देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*

*शहाणपणाचं ओझं*

शहाणपणाचं ओझं पाठीवर वाहून नेताना
प्रशंसा करणारे शत्रू वाटायला लागले,

स्वत:ला आरशात खोल वर पाहताना
स्व- जिवंत असण्यावर आश्चर्य वाटायला लागले,

वेड्यांच्या जगात स्वत:ला खरे ठरवताना
खोट्या हास्याची साथ हवी हवी वाटली,

स्वत:चं अस्तित्व टिकावं म्हणून स्व – गहाण ठेवताना मी लोकांना बघितलं

मग आपल्या शहाणपणाचा पेटारा सोबत बाळगून मूर्ख होऊन जगणंच आवडायला लागलं.

म्हणे स्वतंत्र देशात स्वतंत्र होऊन जगण्याचा आनंद हा निराळाच सगळे सांगतात

मात्र अजूनही मान वाकवून गुलामापरीस जगणारे माझी परिभाषा खोटीच ठरवतात.

सार्‍या जगाला खोटं ठरवताना मात्र शेवटी स्वत:चा खरेपणा सहन होत नाही

आरशाला पण त्याच्या पारदर्शक असण्याचा गर्व हिणवत नाही..

…… सरलसुधा (तुषार)

 

*संवाद मिडिया*

*गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या हक्काचे घर बुक करा*

*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*

*1 BHK & 2 BHK फ्लॅट्स*

*🏤”दर्पण कन्स्ट्रक्शन”*
*🏚️सावंतवाडी🌳*

*घेऊन आले आहेत…! अगदी 🏞️नरेंद्र डोंगराच्या🌳 कुशीत…! प्रसिद्ध माठेवाडा🛕 परिसरात*

*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*

*📲 अधिक माहितीसाठी संपर्क साधा :-*👇
*9890968845 / +918379896943*

*🏠ऑफिस :- 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग*

*🌐Advt Web link*

———————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा