आंबोलीत मोफत शिक्षण व राहण्याची व्यवस्था असलेल्या भव्य शाळेला मंजूर – शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा शैक्षणिक विकास व्हावा यासाठी आपण पाचशे मुलांच्या राहण्याची व शिक्षणाची मोफत व्यवस्था असलेली भव्य शाळा आंबोली गेळे येथे मंजूर केली आहे लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याचेही माहीती मंत्री दिपकर केसरकर यांनी आज येथे दिली. श्री केसरकर यांनी सावंतवाडी येथे आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले देशाच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये केरळ व राजस्थान त्यांच्यासोबत भारत हा प्रथम क्रमांकावर आहे त्यामुळे त्या राज्यांमध्ये शिक्षणाच्या बाबतीत होणारे वेगवेगळे उपक्रम महाराष्ट्र राज्यातही राबवण्यासाठी आपण केरळ दौरा केला होता तेथील उपक्रम लवकरच आपण राज्यात राबवणार असून चला च्या बाबतीत महाराष्ट्र राज्य पुढे नेणार आहे दुसरीकडे मुलांचं व्यक्तिमत्त्व विकास घडवण्यासाठी शिक्षण विभागाने निर्णय घेतला आहे सायन्स आणि टेक्नॉलॉजी हे विषय विकसित केले जाणार असून त्याला व्यावसायिक शिक्षणाची जोड दिली जाणार आहे यावर्षीपासून सर्वांनाच एकाच वेळी युनिफॉर्म दिले जाणार आहेत पूर्वी काही ठराविक विद्यार्थ्यांना हे गणवेश पुरवले जात होते त्यामुळे इतर मुले नाराज होत होती तसे न करता आता सर्वांनाच गणवेश दिले जाणार आहेत तसेच खेड्यापाड्यातून येणाऱ्या मुलांना बूट व सॉक्स सुद्धा पुरवले जाणार आहेत सिंधुदुर्ग ला शिक्षणाच्या बाबतीत पुढे नेण्यासाठी आपण आंबोली गेळे येथे मुलांना शिक्षण व राहण्याची सोय असलेली भव्य शाळा मंजूर केली आहे त्या ठिकाणी सर्व व्यवस्था ही मोफत असून त्याचा सर्व खर्च महाराष्ट्र शासन उचलणार आहे.