You are currently viewing केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या दशावतारी नाट्यमहोत्सवाचे आ. नितेश राणे यांच्या शुभहस्ते उद्घाटन

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या दशावतारी नाट्यमहोत्सवाचे आ. नितेश राणे यांच्या शुभहस्ते उद्घाटन

कणकवली

माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त संदेश सावंत आणि समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने ७ एप्रिल ते १० एप्रिल २०२३ दरम्यान दशावतारी नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ७ एप्रिल पासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. आ. नितेश राणे यांच्या शुभहस्ते सदर नाट्य महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, जि. प. माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, जि. प. माजी अध्यक्ष संजना सावंत, पं. स. माजी सभापती मनोज रावराणे, प्रज्ञा ढवण, मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, वागदे सरपंच संदीप सावंत, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे, आशिये सरपंच महेश गुरव, शिवा राणे, हळवल माजी सरपंच संतोष गुरव, कळसुली सरपंच सचिन पारधीये आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आम्ही लाल परी निर्मित विलास खानोलकर लिखित, गणपत घाणेकर आणि सहा. दिग्दर्शक सुहास वरुणकर यांचा आम. नितेश राणे यांच्या शुभहस्ते सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच या कार्यक्रमांना १० एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे स्वतः उपस्थित राहणार असून ते देखील या ठिकाणी कलाकारांचे गौरव करणार आहेत. तसेच १० रोजी त्यांचा वाढदिवस असल्याने सर्व राणे प्रेमींच्या हस्ते या ठिकाणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विशेष वाढदिवस देखील करण्यात येणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा