You are currently viewing कणकवली मतदारसंघातील ३७९ विद्यार्थिनींना मोफत सायकल – नितेश राणे 

कणकवली मतदारसंघातील ३७९ विद्यार्थिनींना मोफत सायकल – नितेश राणे 

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वाढदिवशी करणार शुभारंभ…

कणकवली

कणकवली,देवगड, वैभववाडी मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील ३७९ गरजू शालेय मुलींना स्वखर्चाने सायकल प्रदान करणार असल्याची घोषणा आमदार नितेश राणे यांनी आज केली.केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १० एप्रिल रोजी हा सामाजिक उपक्रम सुरू करत असल्याचे श्री.राणे यांनी सांगितले.
पहिल्या टप्यात शाळेतील एकूण ३८९ मुलींना मोफत सायकल वाटप करण्यात येणार आहे. त्यापैकी प्रथम १०० विद्यार्थिनींना त्यांच्या शाळेच्या माध्यमातून सायकल वाटप करण्यात येणार आहे. जेव्हा ह्या विद्यार्थिनी शाळेतून शिक्षण घेऊन बाहेर पडतील तेव्हा ती सायकल शाळेत जमा केली जाईल व त्याचा लाभ अन्य गरजू मुलींना दिला जाईल असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले. यासंदर्भातील गरजू विद्यार्थिनींची आकडेवारी अधिकृतपणे शिक्षण विभागाकडून उपलब्ध झाल्याचे आमदार राणे म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा