कणकवली
राजमुद्रा मेडिकल फाउंडेशन व दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने मोफत दिव्यांग आरोग्य तपासणी शिबीर नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे संपन्न झाले आहे .
यातील ज्यांना गरज आहे अशा लोकांना नंतर तज्ञ डॉक्टर मार्फत तपासणी करून कानाच्या मशीन, व्हीलचेअर, कुबड्या ई साहित्य वाटप ही काही दिवसांत करणार असल्याचे आयोजकांनी जाहीर केले आहे.
यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, खरेदी विक्री संघ कणकवली संचालक पंढरी वायंगणकर , अस्थी रोग तज्ञ डॉ. निखील अवधूत, नांदगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता तपसे ,अनिल शिंगाडे ग्रामसेवक संगीता पाटील ,निलम राणे आदी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
यावेळी सुत्रसंचालन व आभार ऋषिकेश मोरजकर यांनी केले.