उपजिविका सल्लागार पदासाठी 21 एप्रिल पर्यंत अर्ज सादर करावे
सिंधुदुर्गनगरी
हिरकणी लोकसंचलित साधन केंद्र सीएमआरसी व्दारा सल्लागार म्हणून 11 महिने कालावधीसाठी उपजिविका सल्लागार नेमावयाचे आहेत. पात्र, इच्छुक उमेदवारांनी संबंधित सीएमआरसीकडे कार्यालयीन वेळेत दिनांक 21 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज करावेत. असे आवाहन हिरकणी लोकसंचलित साधन केंद्राचे अध्यक्ष यांनी केले आहे.
पदाचे नाव :- उपजिविका सल्लागार. पदांची संख्या एक, शैक्षणिक पात्रता व अनुभव, कृषी, पशुसंवर्धन अथवा तत्सम निगडीत क्षेत्रातील पदवी. संबंधित क्षेत्रात कार्यक्षेत्रात काम करण्याचा किमान 2 वर्षाचा पदव्युत्तर अनुभव. व्हॅल्युचेन प्रकल्प आखणी राबविण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य. वयोमर्यादा, 40 वर्षापर्यंत. संगणक, MSCIT तत्सम डिप्लोमा आवश्यक. मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल वापराता येणे आवश्यक.मानधन, प्रती माह रु. 15000 पर्यंत मानधन.(नियमानुसार सेवा कर). अनुभव व पात्रतेनुसार मानधन ठरविण्याचे अधिकार संबंधित अध्यक्ष सीएमआरसी यांच्याकडे राहतील.
अर्ज करण्याचा पत्ता,अध्यक्षा हिरकणी लोकसंचलित साधन केंद्र कणकवली व्दारा, चंद्रशेखर हरी वरवडेकर,LIC ऑफिस समोर, तेलीआळी, ता.कणकवलील जि. सिंधुदुर्ग 416602, क्रमांक 8275364463 वर संपर्क साधावा.