देवगड :
कालवीवाडी तरुणोत्साही ग्रामस्थ मंडळ कालवी व कालवीवाडी युवक मंडळ मुंबई यांच्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त कालवी येथील हनुमान मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हनुमान जन्मोत्सव मंत्रपठण व पूजा विधी, सत्यनारायणाची महापूजा, महाआरती, झाली यावेळी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलेली पहायला मिळाली.
त्यानंतर महाप्रसाद असंख्य भाविकांनी लाभ घेतला.हनुमान जयंतीचे औचित्य साधून या मंडळाच्या वतीने आरोग्य तपासणी , नेत्र तपासणी व जिल्हा रक्तपेढी रुग्णालय ओरस यांच्या वतीने रक्तदान शिबिर अश्या सामाजिक उपक्रमाचे आयोजन देखील केले होते . या शिबिराचे उद्घाटन देवगड पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मंडळाच्या वतीने पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, सिंधू रत्न रक्तपेढीचे पंढरीनाथ आचरेकर, जाधव यांचा व उपस्थित मान्यवराचा देखील मंडळाच्या वतीने शाल ,श्रीफळ, देऊन सत्कार केला. या रक्तदान शिबिराला व आरोग्य शिबिर नेते चांगला प्रतिसाद मिळाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांना सम्मानपत्र देण्यात आली.२५ पेक्षा जास्त लोकांनी रक्तदान केले. तसेच नेत्र तपासणी व आरोग्य शिबिरात तपासणी केली.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात कालवी गावातील महिला ग्रामस्थांसाठी हळदीकुंकू समारंभ सायंकाळी हरिपाठपठण, ढोल पथक व स्थानिक गावातील मुलांची रेकॉर्ड डान्स स्पर्धा आदी कार्यक्रम सायंकाळच्या सदरात होणार असल्याचे मंडळाचे वतीने सांगण्यात आले.
यावेळी घेतलेल्या रक्तदान शिबिरात जिल्हा रक्तपेढीचे डॉ समाधान, डॉ मयुरी शिंदे, प्रांजली परब ,उल्हास राणे ,सुरेश डोंगरे, नितीन गावकर तसेच डॉ गद्रे आय केअर देवगडच्या मार्फत आयोजित नेत्र तपासणी शिबिरात डॉ. दशरथ फाळके, अनिकेत कावले, रेखा कुबल, तसेच मंडळांचे युवा संघटक सागर मांडवकर, ग्रामपंचायत सदस्य शेखर धुरी माजी तंटामुक्ती अध्यक्ष अशोक घाडी, निखेश गुरव, सुभाष घाडी संदेश बने,अनंत शिंदे, सुभाष घाडी, राजन घाडी, मंगेश फाळके, संदीप शिंदे, दिलीप गावकर, सुभाष शिंदे, उमेश फाळके, सदानंद फाळके, सचिन गुरव, जितेंद्र मांडवकर, प्रवीण फाळके, बबन घाडी, सुभाष शिंदे, योगेश गावकर, आदी तसेच कालवी ग्रामस्थ उपस्थित होते.