डीएसएम परीक्षेचा निकाल जाहीर
तळेरे
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका (डीएसएम) परीक्षा २०२० मध्ये सरंबळ इंग्लिश स्कूल ता.कुडाळचे मुख्याध्यापक विवेकानंद बळीराम बालम यांनी ९७.३८ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक तर कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र विष्णू नारकर यांनी ९७.२५ टक्के गुणांसह व्दितीय येण्याचा मान पटकावला आहे, तसेच मालवण येथील टोपीवाला हायस्कूलचे दत्तप्रसाद सदाशिव खानोलकर व मराठा मंदिर न्यू इंग्लिश स्कूल पालीच्या शिक्षिका श्रीम.मानसी महेश पाखरे या 97 टक्के गुणासह विभागून तृतीय आले आहेत.
बॅ. नाथ पै बीएड कॉलेज कुडाळ केंद्रातून या परीक्षेला एकूण 41 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सर्वच विद्यार्थी विशेष प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले असून या केंद्राचा १००टक्के निकाल लागला आहे.
या सर्व यशस्वी गुणवंताचे केंद्रप्रमुख प्रा.परेश सत्यवान धावडे व केंद्र समन्वयक प्रा. नितीन साबाजी बांबर्डेकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.