You are currently viewing कणकवली रोटरीच्या वतीने दिव्यांगांचे जयपूर कृत्रिम हात, पाय साठी मोजमाप

कणकवली रोटरीच्या वतीने दिव्यांगांचे जयपूर कृत्रिम हात, पाय साठी मोजमाप

कणकवली

रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंटर, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, रोटरी लोककल्याण मंडळ, कोल्हापुर यांच्या संयुक्त विध्यमाणे दिव्यांग व्यक्तिना जयपुर फूट आणि हात पुरविणे साठी १७ दिव्यांग व्यक्तिची मोजमापे घेणेत आली. गरजू व्यक्तींना या मोजमापाच्या आधारावर लवकरच जयपूर कृत्रिम हात आणि पाय देण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.या लोककल्याण मंडळचे व्यवस्थापक टी.व्ही. चव्हाण, तंत्रज्ञ अरुण कांबळी, यांनी मोजमाप घेतले.
शिवडाव हायस्कूल शिवडाव येथे रोटरी क्लब कणकवली तर्फे सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन हस्तांतरण करण्यात आले याप्रसंगी सर्वश्री लवु पिळणकर, डॉ.सुहास पावसकर, डॉ विद्याधर तायशेटे, वर्षा बांदेकर, रविन्द्र मुसले, दिशा अंधारी, दादा कुड़तरकर, दीपक बेलवलकर, ॲड.दीपक अंधारी, संतोष कांबळे, नितिन बांदेकर, मेघा गांगण, तृप्ती कांबळे गुरुनाथ पावसकर इतर रोटेरियन तसेच जी प सदस्य सौ घारे तसेच शिवडाव हायस्कूलचे शाळा समिती अध्यक्ष नितीन गावकर व पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक भागवत सर,व ाळके सर इत्यादी उपस्थित होते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा