You are currently viewing वीस वर्षीय युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न..!

वीस वर्षीय युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न..!

सावंतवाडी

शहरातील एका वीस वर्षीय युवतीने घराच्या बाथरूममध्ये गळाफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. सदर युवतीला तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. मात्र, तिची प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारसाठी गोवा- बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयातून सदर प्रकारची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी नातेवाईकांचा जबाब घेतला आहे. युवतीवर गोवा- बांबोळी येथे उपचार सुरू असून तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा