You are currently viewing मोफत दिव्यांग आरोग्य तपासणी शिबीर व साहित्य वाटप

मोफत दिव्यांग आरोग्य तपासणी शिबीर व साहित्य वाटप

सिंधुदुर्गनगरी

राजमुद्रा मेडिकल फौंडेशन व दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल यांच्या वतीने जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने ७ एप्रिल रोजी मोफत दिव्यांग आरोग्य तपासणी शिबीर प्राथमिक आरोग्य केंद्र नांदगाव येथे सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे . गरजू दिव्यांग बांधवांना नंतर तज्ञ डॉक्टरा मार्फत तपासणी करून कानाच्या मशीन, व्हीलचेअर, कुबड्या ई साहित्य वाटप करण्यात येणार आहे .

कणकवली, देवगड व वैभववाडी या तालुक्यातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा असे डॉ तपसे व अनिल शिंगाडे यांनी आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा