सिंधुदुर्गनगरी
सावतंवाडी तालुक्यात पुढील प्रमाणे कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये सावंतवाडी शहरामध्ये पुढील कंटेन्मेंट झोन आङेत. सबनिसवाडा येथे दिनांक 10 नोव्हेंबर 2020 रोजीपर्यंत, खासकिलवाडा येथील घर क्र. ई-223 अ येथे दिनांक 14 नोव्हेंबर 2020 रोजीपर्यंत, खासकिलवाडा येथील पी.डब्ल्यु डी. क्वार्टर्स क्र. 1 येथे दिनांक 13 नोव्हेंबर 2020 रोजी पर्यंत, साईदीप दर्शन इमारत अ विंग येथे दिनांक 13 नोव्हेंबर 2020 रोजी पर्यंत, उभाबाजार येथे 11 नोव्हेंबर 2020 रोजी पर्यंत, वैश्यवाडा, विनायक मेन्शन रेसीडन्सी येथे दिनांक 13 नोव्हेंबर 2020 रोजी पर्यंत. तर मौजे बांदा गडगेवाडी येथे दिनांक 8 नोव्हेंबर 2020 रोजी पर्यंत, मौजे आजगांव भोम-मधलीख्रिश्नवाडी येथे 6 नोव्हेंबर 2020 रोजी पर्यंत कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये जाहीर करण्यात आलेल्या दिनांकापर्यंत सर्व अस्थपना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच नागरिकांच्या येण्या-जाण्यास व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. सदर आदेश अत्यावश्यक सेवा जसे सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था इ. वितरीत करणारे, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या वाहनांना लागू असणार नाहीत. या आदेशाचा भंग केल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 व 58, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 71,139 आणि भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल असे आदेश सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी दिले आहेत.