You are currently viewing शहीद सुभेदार अजय ढगळे यांच्यावर मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार…

शहीद सुभेदार अजय ढगळे यांच्यावर मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार…

चिपळूण :

रत्नागिरी जिल्हयाचे सुपुत्र शहीद सुभेदार अजय ढगळे यांच्यावर आज त्यांचे मूळ गावी चिपळूण तालुक्यातील मोरवणे येथे शासकीय तसेच लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद सुभेदार अजय ढगळे यांची अंतयात्रा बहुदूरशेख नाका ते मोरवणे गावापर्यंत काढण्यात आली. यावेळी शहीद जवानाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने जनसागर उसळला होता.
बहादुरशेख नाका येथून शहीद अजय ढगळे यांची अंत्ययात्रा त्यांचे मूळ गाव मोरवणे दरम्यान काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी गर्दी केली. शहीद अजय ढगळे साहब अमर रहे… भारत माता की जय च्या घोषणांनी वातावरण शोकाकुल झाले होते.
अंत्यसंस्काराला उपस्थित असलेले उद्योगमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी देवेंदर सिंह, जिल्हा परिषद सीईओ किर्ती किरण पूजार, आमदार भास्कर जाधव, शेखर निकम, लेफ्टनंट कर्नल रोशन चव्हाण, आजी माजी सैनिक तसेच नागरिकांनी शहीद सुभेदार अजय ढगळे यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहिली. तसेच शहीद कुटुंबाची भेट घेत संत्वन केले.
यावेळी सैन्य दल आणि पोलीस दलाकडून अजय ढगळे यांना फैरी झाडत मानवंदना देण्यात आली. शहीद सुभेदार अजय ढगळे यांच्या कुटुंबाकडे यावेळी भारतीय सैन्य दलाकडून तिरंगा ध्वज अर्पण करण्यात आला. शहीद सुभेदार अजय शांताराम ढगळे यांच्या अंतयात्रेला व अंतसंस्काराला मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.
भारत-चीन सीमेवर रस्ता बनविण्यासाठी जागची रेकी करण्यासाठी गेलेले मोरेवणे गावचे सुपुत्र सुभेदार अजय शांताराम ढगळे हे देशसेवा करत असताना शहीद झाले. ते 108 इंजिनियर्स बटालियन मध्ये कार्यरत होते. शहीद अजय ढगळे हे कारगील याआधी झालेल्या लढाईमध्ये टायगर हिल जिंकणाऱ्या जांबाज बहादुर टिममध्ये देखील ते होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा