देवगड
सम्यक् ज्ञान, सम्यक् दर्शन, सम्यक् चरित्र या तत्त्वांसह भगवान महावीरांनी संपूर्ण समाजाला . आत्मज्ञानाच्या मार्गावर नेले. शांतता, अहिंसा व बंधुत्वाच्या माध्यमातून या जगाचं कल्याण होऊ शकतं ही त्यांनी दिलेली शिकवण अंगीकारण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा.
अतिशय अल्पपप्रमाणात ठिकठिकाणी विखुरलेला जैन समाज भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सवाच्या माध्यमातून एकत्र येतो ही अतिशय कौतुकास्पद आहे.यातूनच आपले उद्याचे भवितव्य घडणार आहे.आपल्या समाजातील घटती संख्या ही बाब चिंतनीय असून त्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करणे महत्वाचे आहे.तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगू द्या.जैन समाज हा नोकरी देणारा समाज असला तरी उदयीग व्यवसाय निर्माण करणे महत्वाचे आहे .असे प्रतिपादन अखिल भारतीय सोमवंशीय दिगंबर जैन कासार समाज संस्थेचे केंद्रीय उपाध्यक्ष विजय उर्फ आण्णा कासार यांनी बोर्डवे येथील भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सवात बोलताना केले.
सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवार २३ वे स्नेहसंमेलन व भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव सोमवार दि.३ एप्रिल २०२३ रोजी जैन मंदिर बोर्डवे ता.कणकवली पार पडला ..
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी दिगंबर जैन कासार समाज संस्था कोकण विभाग उपाध्यक्ष दयानंद मांगले, देवगड प्रमुख पाहुणे दान चिंतामणी पुरस्कार प्राप्त दानशूर दिगंबर जैन कासार समाज संस्था केंद्रीय उपाध्यक्ष विजय उर्फ आण्णा कासार पुणे उपस्थित होते .त्यांचे समवेत व्यासपीठावर तरी सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवार अध्यक्ष डॉ दीपक तुपकर ,सल्लागार बाळासाहेब डोर्ले,अशोक ठोबरे,राजाराम दंताळ, महावीर मांगले,रवींद्र पोकळे,सिंधुदुर्ग जिल्हा जैन महिला मंडळ अध्यक्षा सौ .पौर्णिमा मांगले बोर्डवे सरपंच सौ वेदांगी पाताडे उपसरपंच सचिन साळवी उपस्थित होते.दिगंबर जैन मंदिरात भगवान महावीर पूजा अभिषेक,श्री कालिका माता पूजन आणि भगवान महावीर जन्मकल्याण उत्सव साजरा करण्यात आला. नमोकार महामंत्र महावीर अष्टक पठण करून स्नेहसंमेलन सोहळ्यास प्रारंभ झाला.स्वागत परिचय सौ पद्मा दंताळ ,यांनी करून प्रास्तविक डॉ दीपक तुपकर ,यांनी केले.प्रमुख पाहुणे व अध्यक्ष समाज बांधव उपसरपंच सचिन साळवी यांचा सत्कार करण्यात आला.
या निमित्ताने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना व गुणवंतांना पारितोषिक सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.त्याचबरोबर समाजातील गरजू गरीब तीन कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट सुपूर्द करण्यात आले.
या निमित्ताने आपल्या अध्यक्षीय भाषणात कोकण विभाग अध्यक्ष दयानंद मांगले यांनी जैनधर्मात समाजात अनेक पोटजाती असल्या तरी आपण सर्व जैन आहोत भगवान महावीरांच्या शिकणुकीचे पालन करीत आहोत त्यासाठी संघटित रहाणे व आपली संस्कृती टिकविणे महत्वाचे आहे. सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवार परिवार गेली २३ वर्षे स्नेहसंमेलन व जन्मकल्याण महोत्सव या माध्यमातून जैन धर्माची संस्कृती,परंपरा,व समाज संघटनांची मोलाची कामगिरी बजावीत आहे.असे सांगून दिगंबर जैन कासार समाज संस्थेच्या आयोजित केलेल्या राज्यस्तरीय महिला मेळाव्यात तसेच वधुवर परिचय मेळाव्यात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले.या वेळी सल्लागार बाळासाहेब डोर्ले,सुनंदा साळवी,यानी मार्गदर्शन केले. सोहळ्यानिमित्त केंद्रीय उपाध्यक्ष विजय (आण्णा)कासार यांचा देवगड आंबा पेटी ,शाल श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी जिल्हा अध्यक्ष सुनील त्रिभुवणे,उपाध्यक्ष चंद्रप्रभ बोगार,कोषाध्यक्ष अमोल साळवी सदस्य भाऊ बोगार,प्रथमेश बिजितकर उपस्थित होते.सोहळ्याचे सूत्रसंचालन सौ.दीपिका बिजितकर यांनी ,आभार सचिव दिपराज बिजितकर यांनी मानले.