You are currently viewing आरोंदा येथे अवैध वाळू उपस्यावर महसूलची मोठी कारवाई

आरोंदा येथे अवैध वाळू उपस्यावर महसूलची मोठी कारवाई

दोन मजूरांसह सात होड्या ताब्यात

सावंतवाडी

आरोंदा तळवणे भागात तेरेखोल नदी पात्रात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या वाळू उपशावर महसूल विभागाने धडक कारवाई केली. मंगळवारी पहाटे करण्यात आलेल्या या कारवाईत दोन परप्रांतीय मजुरांसह सात होड्या ताब्यात घेण्यात आल्या. सावंतवाडी तहसीलदार अरुण उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा