You are currently viewing धान खरेदी पोटी 5 हजार 544 शेतकऱ्यांना 20 कोटी 52 लाख अदा – जिल्हा मार्केटिंग अधिकारी अनिल देसाई

धान खरेदी पोटी 5 हजार 544 शेतकऱ्यांना 20 कोटी 52 लाख अदा – जिल्हा मार्केटिंग अधिकारी अनिल देसाई

सिंधुदुर्गनगरी

शेतकऱ्यांकडून जिल्ह्यामध्ये 2022-23 हंगामात एकूण 1 लाख 622.25 क्विंटल धान* *खरेदी झालेली आहे. त्यासाठी शासनाकडून 5 हजार 544 शेतकऱ्यांना 20 कोटी 52 लाख 69 हजार 390 इतकी रक्कम त्याच्यां खाती अदा केलेली आहे. अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी अनिल देसाई यांनी दिली.

राज्य शसनाकडून प्राप्त झालेली प्रोत्साहनपर राशी (बोनस) 5 हजार 621 शेतकऱ्यांचे खात्यामध्ये रक्कम रुपये 5 कोटी 73 लाख 20 हजार 610 बँक खात्यामध्ये जमा केलेली आहे. प्रोत्साहनपर राशीची रक्कम नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. प्रति हेक्टरी रक्कम रु. 15 हजार जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत रक्कम रु. 30 हजार पर्यंत अदा करण्याची मर्यादा असून शेतकऱ्यांच्या क्षेत्रानुसार रक्कम बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांना त्याचे बँक खात्यामध्ये वरील प्रमाणे रक्कम प्राप्त झालेली नाही. त्या शेतकऱ्यांनी आपण नोंदणी व भात विक्री केलेल्या खरेदी- विक्री संघाचे केंद्रावर जाऊन रक्कम जमा झालेली नाही यांची माहिती करुन घ्यावी. व आपले बँक खात्यामध्ये व नोंदणीवेळी दिलेल्या बँक खात्यामध्ये तफावत असल्यास त्याची पुर्तता नोंदणी केलेल्या केंद्रावर जाऊन करावी. त्यामूळे आपणास रक्कम अप्राप्त असल्यास रक्कम अदा करणे सोईचे होईल. खरेदी केंद्रावर जाऊनही कार्यवाही न झाल्यास जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय खडपकर बिल्डींग ओरोस फाटा येथे 8108182934 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी श्री. देसाई यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा