बांदा
भारतातील नं.१ समजल्या जाणाऱ्या ब्रेन डेव्हलपमेंट स्काॅलरशिप परीक्षेत बांदा नं.१ केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत सुयश प्राप्त केले.
जानेवारी २०२३ मध्ये पार पडलेल्या या परीक्षेत बांदा केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया रॅॅंकमध्ये स्थान मिळवले यामध्ये इयत्ता पहिलीमधून शुभ्रा सागर तेली हिने ८९गुण व स्वरा सिताराम माजगावकर हिने ८४गुण मिळवत ब्रांझ मेडल प्राप्त केले. इयत्ता दुसरीमधून आयुष रमेश पवार याने ८७ व समर्थ सागर पाटील याने ८२ गुण मिळवत ब्रांझ पदक प्राप्त केले. इयत्ता तिसरीमधून दुर्वा दत्ताराम नाटेकर हिने ९१गुण मिळवत सिल्वर पदक प्राप्त केले.या परीक्षेला बसलेले शाळेतील भद्र हेमंत मोर्ये सृष्टी साहेबराव शेवाळे, वसंत सुशील कामटेकर, काव्या सूर्यकांत चव्हाण, स्वरा दीपक बांदेकर, शुभ्रा दत्तगुरु म्हाडगूत, साहिल आनंद कोळपटे सर्वेक्षा नितीन ढेकळे ,पूर्वा हेमंत मोर्ये, अमोघ राजेश वालावलकर ,चैतन्य सुशांत वराडकर ,गौरांग सहदेव देसाई, लौकिक महादेव तळेवडेकर, साईराज सचिन गवस हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर वर्गशिक्षक जे.डी.पाटील,प्राजक्ता पाटील, शुभेच्छा सावंत, रंगनाथ परब, वंदना शितोळे ,गोपाळ साबळे, पदवीधर शिक्षिका उर्मिला मोर्ये,सरोज नाईक,रसिका मालवणकर,जागृती धुरी,शितल गवस, प्रशांत पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे केंद्र प्रमुख संदीप गवस शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश मोरजकर, उपाध्यक्ष श्रद्धा नार्वेकर, सरपंच प्रियंका नाईक यांनी अभिनंदन केले आहे