सावरकर प्रेमींना बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
वेंगुर्ला
वेंगुर्ला येथील हिंदू धर्माभिमानी मंडळींच्या वतीने शनिवार दिनांक 8 एप्रिल 2023 रोजी संध्याकाळी ठीक पाच वाजता *स्वातंत्र्यवीर सावरकर सन्मान यात्रेचे* आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा वेंगुर्ला वासियांची ग्रामदेवता श्री देव रामेश्वर मंदिर येथून सुरू होणार असून पुन्हा तेथेच विसर्जित होणार आहे. सदर विषयासंदर्भात एक नियोजन बैठक आज दिनांक १ एप्रिल २०२३ रोजी संध्याकाळी पाच वाजता श्री देव रवळनाथ मंदिर येथे संपन्न झाली.या बैठकीस वेंगुर्ल्यातील प्रतिष्ठित नागरिक आवर्जून उपस्थित होते. विश्व हिंदू परिषदेचे वेंगुर्ला प्रखंड अध्यक्ष अरुण गोगटे , मंत्री आप्पा धोंंड , प्रसन्ना देसाई , सुहास गवंडळकर , राजन गिरप , सुषमा खानोलकर , रा.स्व.संघाचे मंदार बागलकर , बाबुराव खवणेकर सर ,अमित नाईक , गुरुप्रसाद खानोलकर , महादेव तथा भाऊ केरकर, अजित राऊळ सर, भूषण पेठे, गिरीश फाटक , सचिन वालावलकर , सुनील डुबळे, उमेश येरम , अभी वेंगुर्लेकर , शेखर काणेकर , रविंंद्र शिरसाठ तसेच समस्त हिंदू धर्माभिमानी आणि नरेंद्र महाराज संप्रदायाचे कार्यकर्ते प्रतिनिधी परमानंद करंगुटकर,शेखर राणे,निलेश बोंद्रे व शिवा तारी उपस्थित होते.
सावरकरांवर टीकेची झोड उठवून वातावरण गढूळ करणाऱ्यांच्या दुष्कृत्यांवर सद्विचारांची तुरटी फिरवण्याच्या व वातावरण पवित्र करण्याच्या दृष्टीने सन्मानयात्रा संपल्यानंतर ठीक सहा वाजता श्री देव रामेश्वर मंदिरात हरिभक्त परायण *संदीप बुवा माणके, पुणे* यांचे अभ्यासपूर्ण *कीर्तन* होणार असून कीर्तनाचा विषय *हिंदुधर्माभिमानी सावरकर* असा असणार आहे. कीर्तनाच्या समारोपानंतर श्री नरेंद्र महाराज संप्रदायाकडून अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली असून वेंगुर्ला तालुक्यातील सावरकर भक्तांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे असे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.