You are currently viewing कोहली-डुप्लेसिसमुळे आरसीबीचा विजय

कोहली-डुप्लेसिसमुळे आरसीबीचा विजय

*कोहली-डुप्लेसिसमुळे आरसीबीचा विजय*

*मुंबईने सलग ११व्यांदा पहिला सामना गमावला*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलच्या १६व्या मोसमात मुंबई इंडियन्सचा पराभव करत धमाका केला. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला सामना त्यांनी आठ विकेट्सने जिंकला. रविवारी (२ एप्रिल) आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने २० षटकांत सात विकेट गमावत १७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीने १६.२ षटकांत दोन गडी गमावून १७२ धावा करून सामना जिंकला.

आयपीएल हंगामातील पहिला सामना मुंबई इंडियन्ससाठी काही खास ठरत नाही. यावेळीही तसेच झाले. मुंबईचा संघ सलग ११व्यांदा मोसमातील पहिला सामना हरला आहे. त्यांनी २०१२ मध्ये पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता. दुसरीकडे, गेल्या सहा सामन्यांत आरसीबीने मुंबईचा पाचव्यांदा पराभव केला आहे. तसेच, आरसीबीने मुंबईविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर ११ सामन्यांत तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. यापूर्वी २०१३ मध्ये दोन धावांनी आणि २०१८ मध्ये १४ धावांनी विजय मिळवला होता.

कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि अनुभवी फलंदाज विराट कोहलीने संघाला विजयापर्यंत नेले. दोन्ही अनुभवी फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीला कोहली आणि डुप्लेसिसने चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. कोहली आणि डुप्लेसिसने १४.५ षटकांत १४८ धावा जोडल्या.

डुप्लेसिस ४३ चेंडूत ७३ धावा करून बाद झाला. त्याने पाच चौकार आणि सहा षटकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट १६९.७७ होता. त्याचवेळी कोहलीने ४९ चेंडूत नाबाद ८२ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि पाच षटकार मारले. विराटचा स्ट्राईक रेट १६७.३५ होता. ग्लेन मॅक्सवेल तीन चेंडूत दोन षटकारांच्या मदतीने १२ धावा करून नाबाद राहिला. दिनेश कार्तिक खातेही उघडू शकला नाही. मुंबई इंडियन्सकडून अर्शद खान आणि कॅमेरून ग्रीन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

डावखुरा फलंदाज तिलक वर्माने ४६ चेंडूत नाबाद ८४ धावा करत मुंबई इंडियन्सला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. एका टोकाकडून मुंबईच्या विकेट्स सतत पडत होत्या आणि तिलक दुसऱ्या टोकाकडून सतत धावा काढत होता. त्याने डावाच्या शेवटच्या चेंडूवर हर्षल पटेलला षटकार ठोकला. त्याच्या खेळीमुळे मुंबईने १७० धावांचा टप्पा पार केला.

तिलकने आपल्या खेळीत नऊ चौकार आणि चार षटकार मारले. ५.२ षटकात तीन विकेट पडल्यानंतर तिलक खेळपट्टीवर आला. त्यावेळी संघाची धावसंख्या २० होती. तेथून त्याने मुंबईला १७० धावांच्या पुढे नेले. तिलकने सूर्यकुमार यादवसोबत चौथ्या विकेटसाठी २८ धावांची भागीदारी केली. यानंतर त्याने निहाल बधेरासोबत पाचव्या विकेटसाठी ३० चेंडूत ५० धावा जोडल्या. त्यानंतर त्याने अर्शद खानसोबत सातव्या विकेटसाठी १८ चेंडूत नाबाद ४८ धावांची भागीदारी केली.

मुंबईच्या नऊपैकी चार फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. कॅमेरून ग्रीन आणि हृतिक शोकीन प्रत्येकी पाच धावा करून बाद झाले. टीम डेव्हिडने १० चेंडूत चार आणि कर्णधार रोहित शर्माने १ धावा केल्या. आयपीएलच्या सलग १५व्या डावात रोहितला अर्धशतक झळकावता आले नाही. निहाल बधेराने १३ चेंडूत २१, सूर्यकुमार यादवने १६ चेंडूत १५, इशान किशनने १३ चेंडूत १० आणि अर्शद खानने नऊ चेंडूत नाबाद १५ धावा केल्या. आरसीबीकडून कर्ण शर्माने दोन बळी घेतले. मोहम्मद सिराज, रीस टपली, आकाश दीप आणि मायकेल ब्रेसवेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

कर्णधार फाफ डुप्लेसिसला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

 

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*प्रॉपर्टी विकणे आहे*

*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*

*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*

*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*

*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*

*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*

*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈

*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*

*👉पारदर्शक व्यवहार*🔍

#######################
*Advt link …👇*

*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*

*▪️घर धरून 03 गुंठे जागा*

*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*

*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*

*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*

*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*

*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*

*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा