You are currently viewing खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या 10 वी व 12 वी विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन सादर करावेत…..

खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या 10 वी व 12 वी विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन सादर करावेत…..

– सचिव डॉ अशोक भोसले

सिंधुदुर्गनगरी  

सन 2021 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत परीक्षा (इ.10 वी) व उच्च माध्यमिक परीक्षा (इ. 12 वी) साठी खाजगीरित्या (फॉर्म नं. 17) व्दारे प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यानी ऑनलाईन प्रक्रियेव्दारे अर्ज सादर करावेत असे आवाहन, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुण्याचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

            इ. 10 व इ.12 वी खाजगी विद्यार्थी नावनोंदणीचा ऑनलाईन अर्ज स्विकारण्याच्या तारखा पुढील प्रमाणे आहेत. विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी अर्ज व शुल्क भरणे दिनांक 2 नोव्हेंबर 2020 ते 28 नोव्हेंबर 2020 पर्यंत, विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, शुल्क जमा केल्याबाबत पोचपावती व्दारे छायाप्रती व मुळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत/ कनिष्ठ महाविद्यालयात जमा करणे दिनांक 3 नोव्हेंबर 2020 ते 31 नोव्हेंबर 2020 पर्यंत, संपर्क केंद्र  शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीची एक प्रत मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करणे दिनांक 4  डिसेंबर 2020 पर्यंत,

            दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगी रित्या प्रविष्ठ व्हावयाचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या, प्राधिकृत केलेल्या हॉस्पिटलच्या प्रमाणापत्राची छायांकित प्रत अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.

            ऑनलाईन अर्ज इ.10 वीच्या विद्यार्थ्यांनी htpp://form17.mh ssc.ac.in तसेच इ. 12 वीच्या विद्यार्थ्यांनी htpp://form17.mh hsc.ac.in या संकेतस्तळावर भरावा. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी इ. 10 वीचे नोंदणी शुल्क 1 हजार व प्रक्रिया शुल्क 100 रुपये तर इ. 12 वीसाठी नोंदणी शुल्क 500 रुपये व प्रक्रिया शुल्क 100 रुपये आकारण्यात येणार आहे.

            ऑनलाईन अर्ज भरताना कोणतीही अडचण आल्यास अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. 020-25705207,25705208,25705271 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुण्याचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा