You are currently viewing वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्रातर्फे काजू बोंडू प्रशिक्षण संपन्न

वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्रातर्फे काजू बोंडू प्रशिक्षण संपन्न

वेंगुर्ला

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठ दापोलीअंतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला व कॅश्यू फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने काजू बोंडू प्रात्यक्षिकासहीत एक दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा झाली.

या कार्यशाळेस वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ.आर.जी.खांडेकर, काजू विभाग प्रमुख डॉ.आर.टी.भिगार्डे, प्रयोग शाळा प्रमुख डॉ.देशमुख, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक अजय थुटे उपस्थित होते. या कार्यशाळेत काजू बोंडापासून सिरप, स्क्वॅश, नेक्टर, जाम आदी प्रात्यक्षिके मुल्लाणी यांनी दाखविली.

प्रतिक्रिया व्यक्त करा