*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या लेखिका कवयित्री अंजली दीक्षित – पंडित लिखित अप्रतिम लेख*
*मनातलं काही*
*अडगळीतल्या गोष्टी*
शाळा लांब असो वा जवळ त्यावेळी सगळ्या जणी चालतच जात असू. फारच लांब असेल एखादीच घर आणि थोडी बहोत आर्थिक सुबत्ता असेल तरच सायकल घेऊन यायची मुलं (आणि अर्थात भाव खायची).वेदिका,ममता,स्वाती यांच्याकडे शाळेत जाताना बोलवायला जात असू.आम्ही मैत्रिणीच्या घराच्या बाहेरूनच हाक मारायचो तेव्हा त्यांचं आवरलेलं नसायचं, मग त्यांची आजी,काकू,आई आम्हाला आत बोलवायची. वेदिकाकडे डावीकडे जनरल स्टोअर्सचं त्यांचंच दुकान आणि त्याच्या उजव्या हाताला आत जायची चौकट, त्याला तीन चार पायऱ्या. आत गेल्यावर उजव्या बाजूला कडप्पाचा कट्टा. त्याच्याखाली चपलांसाठी कप्पा. वरची जागा आल्या गेलेल्याला किंवा दुपारी निवांतपणे बसायला मोकळी. त्याच्या मागच्या अर्ध्या भिंतीवर खूप साऱ्या तर्हेतर्हेच्या कुंड्या ज्यातून नेहमीच रंगीबेरंगी हसरी फुलं डोकावायची; अगदी माझ्या मैत्रिणीसारखीच. आम्ही त्या कट्ट्यावर टेकायचो. तिची आजी आम्हाला विचारायची, काय गं जेवलीस का? हो म्हटल्यावर पुढचा प्रश्न काय जेवलीस? असं संभाषण चालू राहायचं ते तिचं आवरेपर्यंत. पुन्हा दुपारच्या सुट्टीत कोणाच्या तरी घरी डबा खायला जायचं असलं तर तिचंच घर निवडायचो आम्ही. त्याला कारणही तसंच होतं. तिच्या घरात दुकानाच्या मागं एक रिकामी खोली होती. त्यात अनेक सजावटीच्या वस्तू, हाताने केलेल्या कलात्मक वस्तू, जुन्या गोष्टींपासून बेमालूमपणे तयार केलेल्या कलाकुसरीच्या नावीन्यपूर्ण वस्तू असायच्या. आम्हा मैत्रिणींना फार आश्चर्य वाटायचं.. अरे हे कशापासून केले ते कशापासून केले आणि त्याचे उत्तर ऐकून आम्ही चाट पडायचो. खरंच का ग? तू खोटं बोलतेस असं म्हटलं की तिची काकू, आजी नाहीतर आई यायची आणि म्हणायची या तुम्ही शाळा सुटल्यावर मी शिकवते कसं करायचं ते.
काय भारी वाटायचं त्यावेळी. मग आम्ही घरी जाताना विचारून घेणार याला काय काय जुन्या खराब वस्तू लागतात, त्याला जोडायला काय आणावं लागेल, नवीन काय आणावं लागेल? मग मनातल्या मनात सगळी जुळवाजवळ करायची आणि आई पुढे सगळं कसं भव्य दिव्य करून सांगायचं. अडगळीच्या खोलीत जाऊन उसकपासक करायची. शेवटी इतकं मागे लागायचं की ती बिचारी म्हणायची जा एकदाचं घेऊन आणि कर तुझ्या मनासारखं. त्यावेळी असेही वाटून जायचं की तिची आई तर आम्हाला सुद्धा हे सगळं शिकवायला तयार आहे आणि माझी आई अशी का बरं वैतागते? पण आमचं आपलं स्वतःचं घोडं पुढे दामटणं चालूच राहायचं. तिच्याकडे सुट्टीत जाऊन जाऊन आम्ही खूप गोष्टी करायला शिकलो. स्ट्रॉ ची बाहुली, स्ट्रॉच्या समोस्याचे पडदे, स्पंज ची बाहुली, गेलेल्या बल्बला लोकरीनं विणून तयार केलेला पक्षी आणि किती काय काय? आता सगळ्या वस्तू आठवत देखील नाहीत. जुन्या साडीला कापून त्यापासून पायपोस देखील बनवायला शिकवले होते तिच्या आजीने. पॅराशुट च्या तेलाच्या रिकाम्या बाटलीला झालरीचा फ्रॉक शिवून वर बाहुलीचं तोंड बसवलेलं आठवतंय मला अजून. ती केसांवरून मोठं नेटचं कापड सोडलेली गुलाबी रंगाची बाहुली तर त्यावेळी फार फेमस होती, प्रत्येकाच्या घरात एक तरी दिसायचीच. गळकी बादली अगदी न सांगता कुंड्यांच्या रांगेत जाऊन बसायची. कुंड्यांना पण रंग देऊन आपण सजवू शकतो हे मला असेच एका मैत्रिणीच्या घरी कळलं होतं. हे सगळं फुकटात शिकवलं जायचं..क्लासेस घेऊन नाही. त्यावेळी काय गंमत होती ना, घरातल्या सगळ्या सजावटीच्या वस्तू या घरीच बनवलेल्या असायच्या. त्यात घरातल्याच जुन्या वस्तूंचा वापर अधिक आणि फिनिशिंग फक्त नवीन लेस, बटन यांनी व्हायचं. शाळेतून जे हस्तकलेचे वर्ग असायचे त्यात बनवलेली झुंबरं, भिंतीवर लावायचे फोटो फ्रेम, वॉल हैंगिंग हे सुद्धा सगळ्यांच्या घरात टांगलेले दिसायचे. विकतच्या चकाचक पॉलिश केलेल्या उंची वस्तू फार म्हणजे फार कमी घरात असायच्या. कुठलीही एकदा वापरलेली वस्तू सहसा लगेच भंगार मध्ये जायची नाही. ती पहिले अडगळीच्या खोलीत जायची. मग वेळ पडेल तेव्हा तिथेच शोधली की भेटायची. परत ती पुन्हा पुन्हा वापरून जेव्हा अगदीच नाईलाज व्हायचा तेव्हाच टाकली जायची.
हे चित्र बदलायला फार काळ जावा लागला नाही. फक्त दोन दशकंच खूप झाली. टेबलवर ठेवलेला एम्ब्रॉयडरी किंवा पेंटिंग करून कव्हर घातलेला टीव्ही जाऊन वॉल माऊंटेड एलईडी टीव्ही आला, घराघरात दिमाखात मिरवायला लागला. हस्तकलेच्या वस्तूंनी सजलेले कोनाडे, खुंट्या, भिंती जाऊन सटासट नजरही घसरेल असे उंची पेंट केलेल्या गुळगुळीत भिंती आणि त्याला शोभेल अशी टीव्ही युनिट आली. क्रोशाचे विणकाम, भरत काम, लोकरीचे विणकाम कधी कपाटातल्या कोपऱ्यात दडी मारून बसले कळलच नाही. गुळगुळीत आरस्पाणी टाइल्स वर वितभर पाय आत जाईल अशी कार्पेटस आली आणि जुन्या साड्यां पासून तयार केलेल्या सतरंजीची सुट्टी झाली. असे काय काय आणि कुठले कुठले बदल नजर टिपतच राहिली. जुने वाडे गेले कॉम्प्लेक्स आले. धुळीचे रस्ते जाऊन काँक्रीटचे टकाटक नवे रस्ते आले. बागा जाऊन प्ले एरिया आला. कोपऱ्या कोपऱ्यातली अडगळ जाऊन सुबक कॉर्नर पीस आले. एकत्र कुटुंबाची बदली न्यूक्लिअर फॅमिली मध्ये झाली. घरातली वृद्ध अडगळही ओल्ड एज होम मध्ये कन्व्हर्ट झाली. वर्षातून एखाद्या वेळेस या ओल्डेज होम्स ना भेट देऊन देणगीचा चेक दिला की आपली इती कर्तव्यता झाली त्यातच नवीन पिढी समाधान मानू लागली वर समाजकार्य केल्याचं पुण्यंही पदरी पाडून घेऊ लागली. नजरेसमोर काळ बदलत गेला आणि काळानं आपली नजर ही बदलली.जाहिरातीच्या युगानं चकाचक पॉलिश केलेल्या जगाचं स्वप्न दाखवण्याचा सपाटा लावला आणि आपणही काळाच्या मागे पडायला नको म्हणून वेड्यासारखे त्या स्वप्नाच्या मागं धावत सुटलो. हीच ती लाइफस्टाइल जी मार्केटिंग वाल्यांनी जाणीवपूर्वक धूर्तपणे आपल्यात पेरली, तिची स्वप्नं आपल्याला दाखवली. आता आपण तिचे गुलाम झालो आहोत आणि यातच आपला कम्फर्ट शोधू लागलोत. वापरलं की फेकून द्यायचं पुन्हा तेच वापरणं म्हणजे मागासलेपण, मग ते वस्तूंच्या बाबतीत असो की नात्यांच्या बाबतीत. हे तत्व पद्धतशीरित्या आपल्या डोक्यात बिंबवलं गेलं.
नाऊ यूज अँड थ्रो इज द न्यू नॉर्मल. काय? पटतंय का?
©® अंजली दीक्षित- पंडित
छ.संभाजीनगर
9834679596
संवाद मीडिया*
*👮♂️👮♂️सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली👮♂️👮♂️*
*🔺समर हॉलिडे कॅम्प*🔺
*_🔹The colonel’s Academy for adventure & aero spots आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे उन्हाळी सुट्टीत साहसी व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरे_*
*🔹शिबिर कालावधी – 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2023 व 22 एप्रिल ते 28 एप्रिल 2023*
*🔹वयोमर्यादा – 10 वर्षावरील मुली व मुले*
*🔹प्रशिक्षणाचे विषय🔹*
*_🔸पिटी, योगा, कराटे, रॅपलिंग, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लाइंबिंग, फायरिंग, लीडरशिप डेव्हलपमेंट, सेल्फ डिफेन्स, बर्ड अँड प्लांट ऑब्झर्वेशन, स्पोर्ट, ग्रुप डिस्कशन, गेस्ट लेक्चर वगैरे_*
*👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहिती सर्व फॉर्म सबमिट करावेत*
https://forms.gle/CVGoWJbpoiQ4yeGW8
*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*
*📲राजेंद्र गावडे : 9403366229*
*📲 संजय शिंदे : 9307051091*
*📲Office : 9420195518, 7822942081*
*Advt link …👇*
*————————————–*
*👮♂️!! खुशखबर! खुशखबर!!👮♂️*
*👮♂️भारतीय सैन्यदलात (आर्मी, नेवी, एअर फोर्स) अधिकारी होण्याची नामी संधी.*👮♀️
*_सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे 15 दिवसांचे निवासी NDA प्रवेश परीक्षा व SSB interview मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे._*
*_🔸सदर शिबिर १ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीत इ. ११वी व १२वी (विज्ञान) झालेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे. सदर प्रशिक्षण शिबिर निवासी असून यामध्ये प्रामुख्याने NDA लेखी परीक्षेचे सखोल मार्गदर्शन व SSB मुलाखत प्रशिक्षण, साहसी खेळ, obstacle training, स्वयं सुरक्षा, रायफल शूटिंग व personality development तसेच सर्व प्रकारचे खेळ यांचा समावेश आहे._*
*_👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा_*
https://forms.gle/xxSJxjZSbXXao8hc9
*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*
*📲राजेंद्र गावडे : 9403366229*
*📲 नागेश पांढरे : 9422073840*
*📲Office : 9420195518, 7822942081*
*Advt link …👇*
*————————————–*