You are currently viewing विलवडेत पाणी पिण्यासाठी गेलेल्या बकऱ्यांचा मगरीचे पाडला फडशा

विलवडेत पाणी पिण्यासाठी गेलेल्या बकऱ्यांचा मगरीचे पाडला फडशा

नविभागाने नुकसान भरपाई देण्याची मनसेच्या श्रीराम सावंत यांची मागणी

बांदा

विलवडेत गव्यांनी शेती बागायत नुकसानीचे सत्र सुरुच आहे. आणि आता मगरींचे संकट आले आहे. विलवडे धरण येथे पाणी पिण्यासाठी गेलेल्या दोन बकऱ्यांचा मगरीने पाण्यात ओढून नेत शेतकर्‍याच्या डोळ्यादेखत फडशा पाडला. मालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवित इतर बकर्‍यांना पाण्यात बाहेर काढत त्यांचा जीव वाचवीला. भालावल येथील शेतकरी भालचंद्र रामू कोकरे यांचे २५ हजारांचे नुकसान झाले. ही घटना आज सायंकाळी घडली. वनविभागाने या घटनेची पहाणी नुकसान भरपाई मिळून द्यावी अशी मागणी माजी विलवडे मनसे शाखा प्रमुख श्रीराम सावंत यांनी केली आहे.
आतापर्यंत विलवडे धरण परिसरात मगरीने पाळीव जनावरांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सायंकाळी नेहमीप्रमाणे शेतकरी कोकरे हे बकर्‍यांच्या कळपाला विलवडे धरणात पाणी पिण्यासाठी घेऊन गेले होते. अचानकपणे दबा धरुन बसलेल्या मगरीने बकर्‍यावर हल्ला करत पाण्यात ओढून नेत दोन बकर्‍्य‍ांचा फडशा फाडल्याचे कोकरे यांनी सांगितले. धरण परिसरात दहा हून अधिक (पाच ते दहा फूट लाबींच्या) मगरी आहेत. कोकरे प्रसंगावधान दाखवत मगरी वर दगडांचा वर्षाव केला व आरडाओरड करताच इतर बकर्यांना पाण्यातून बाहेर काढल्याचे कोकरे यांनी सांगितले.
याबाबत संतोष सावंत यांनी निद्रिस्त वनविभाग विरोधात संताप व्यक्त केला आहे. विलवडे व वाफोली धरण परिसरात ठिकठिकाणी मगरींचे वास्तव्य आहे. त्याच बरोबर गव्यारेड्य‍ाचा बंदोबस्त करण्याबाबत वनविभाग चालढकल करीत असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा