You are currently viewing सावंतवाडी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे शव शीतपेटीचे लोकार्पण

सावंतवाडी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे शव शीतपेटीचे लोकार्पण

सावंतवाडी

ज्येष्ठ नागरिक संघ सावंतवाडी यांच्या सौजन्याने जनसेवार्थ उपलब्ध केलेल्या पार्थिव शरीर शीतपेटीचा लोकार्पण सोहळा शनिवारी सावंतवाडी शिरोडा नाका येथील कार्यालयात पार पडला. या उपक्रमाला संघाचे सल्लागार हणमंत देसाई यांचे जावई अशोक पाटील व मुलगी रोहिणी पाटील यांचा मोठा हातभार लाभला असून रूपाली मुद्राळे, अरुण मिस्त्री व प्रकाश राऊळ यांच्याकडे या सेवेची जबाबदारी देण्यात आली आहे. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वजराटकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करून ज्येष्ठ नागरिक संघाला अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी प्रोत्साहन दिले.

यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे खजिनदार अरुण मिस्त्री यांनी एक प्रसंग कथन केला. ज्यावेळी माझी आई मृत्यू पावली होती. त्यावेळी शीत शव पेटीची आवश्यकता होती. परंतु मला कुठेही ती भेटू शकली नाही. म्हणून त्यावेळी मी हा प्रस्ताव ज्येष्ठ नागरिक संघाकडे मांडला असता एक मताने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आणि आज ही शव शीतपेटी सेवेमध्ये दाखल झाली. त्यामुळे आता कोणाच्याही प्रसंगाला या शव शीत पेटीचा उपयोग होऊ शकेल असं मत त्यांनी मांडले.याप्रसंगी डॉ. संदीप सावंत, डॉ.दीपक लादे, डॉ.निखिल अवधूत, तसेच आयुर्वेदिक तज्ञ डॉ.चंद्रकांत सापळे दोडामार्ग व डॉक्टर दत्तप्रसाद पावसकर उपस्थित होते तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बळवंत मसुरकर, उपाध्यक्ष बी एन तेली, सचिव प्रकाश राऊळ, सहसचिव सुधीर धुमे, खजिनदार अरुण मिस्त्री, सदस्य मा. प्राध्यापक सुभाष गोवेकर, अनंत माधव, नारायण मालवणकर, सीमा नाईक, सुलभा टोपले, शिवाजी आळवे, गुरुदास पेडणेकर, हणमंत देसाई, रूपाली मुद्राळे, अर्चना वझे, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, समीरा खलील आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा