*ओंजळीतील शब्दफुले साहित्य समूह सदस्या लेखिका कवयित्री पुष्पा कोल्हे लिखित अप्रतिम लेख*
*सुखी वैवाहिक जीवनासाठी..!*
भारतीय संस्कृतीत मानवाच्या जीवनात जे सोळा संस्कार सांगितले आहेत त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचा संस्कार म्हणजे *विवाहविधी* .
प्रत्येकाच्या आयुष्यातील अनन्यसाधारण महत्वाचा भाग म्हणजे विवाह किंवा.लग्न (Marriage).
*लग्न*या शब्दात संलग्नता सूचित होते ..वैवाहिक जीवनात , म्हणजे लग्न झालेल्या विवाहित जोडप्याने एकमेकांच्या घराशी, कुटुंबाशी जुळलेलं राहणं , एकमेकांच्या भावनांना समजून घेणं अभिप्रेत असतं…!विवाह झाल्यानंतर एकमेकांना जीव लावणं म्हणजे काय ते कळू लागतं अर्थात् पतिपत्नीत निकोप नातं असेल तर ..!
विवाह करण्याआधी एकमेकांना व्यवस्थित पारखून घेणे, विचार जुळतायत का ते पाहणे महत्वाचे असते. यासाठी आधी २-३ वेळा भेटून अंदाज येऊ शकतो. त्यानंतर जर लग्न ठरवलंत तर तुम्ही एकमेकांना आणखी कसे पूरक होऊ शकता, यादृष्टीने प्रयत्न करता येतात. यासाठी तुम्ही दिवसातले काही तास कधी संपूर्ण दिवस एकमेकांना देता. पण एकदा लग्न झाल्यावर ती व्यक्ती तुमच्या २४ तास सोबत राहणार असते. अशावेळी एकमेकांना सांभाळून, चर्चा करून वाटचाल करणं महत्वाचं ठरतं. महत्वाचं म्हणजे, तुमच्या वैवाहिक जीवनात कधीकधी समस्या, संघर्ष निर्माण होऊ शकतात. पण, अशावेळी एकमेकांशी बोलले पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीवर चर्चा करावी. असे लग्नाच्या पहिल्या वर्षापासूनच केले पाहिजे कारण सुरुवातीचा काळ हा विवाहाचा एक महत्त्वाचा टप्पा असतो. त्यामुळेच लग्नाची पहिली दोन वर्षे एकमेकांना समजून घेण्यासाठी या तीन गोष्टींचा सामना करावा लागू शकतो.
गूगलवर वैवाहिक जीवनावर समर्पक भाष्य करणारी एक रचना वाचनात आली .ती इथे उद्धृत करते ..
*लग्न लग्न म्हणजे काय असतं?*
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं
तिच्या प्रश्नाआधी त्याचं उत्तर तयार असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याला लागताच ठसका तिच्या डोळ्यांत पाणी तरळतं
तिला लागताच ठेच त्याचं मन कळवळतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
तिने चहा केला तर त्याला सरबत हवं असतं
त्याने गजरा आणला की नेमकं तिला फूल हवं असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याच्या बेफिकिरीला तिच्या जाणिवांचं कोंदण असतं
तिच्या खर्चाला त्याच्या खिशाचं आंदण असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याच्या चुकांना तिच्या पदराचं पांघरुण असतं
तिच्या दुःखाला त्याच्या खांद्याचं अंथरुण असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
कधी समझोता तर कधी भांडण असतं
तो चिडला तरी तिनं शांत राहायचं असतं
कपातल्या वादळाला चहाबरोबर संपवायचं असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
कधी दोन मनांचं मीलन असतं
तर कधी दोन जिवांचं भांडण असतं
एकानं विस्कटलं तरी दुसऱ्यानं आवरायचं असतं
संकटाच्या वादळाला दारातच थोपवायचं असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
प्रेमाचं ते बंधन असतं
घराचं ते घरपण असतं
विधात्यानं साकारलेलं ते एक सुंदर स्वप्न असतं!
मित्रहो , प्रस्तुत कविता मी लिहिलेली नाही .पण आजच्या या विषयाला किती समर्पक आहे, नाही!
विवाह म्हणजे दोन मनांचं मिलन!एकाचं म्हणणं दुसऱ्याला कायम पटेलच असे नाही . कायम एकमेकांच्या भावनांना जपत, आयुष्यभर तडजोड करावी लागते .Adjustment is the life. जुळवून घेण. हे जुळवून घेणं जमलं नाही तर संसार सुखाचा होत नाही मग काडीमोड ठरलेला्. अशाने पदरी नैराश्य येते .
पूर्वी घरातील वडील मंडळी परस्पर आपल्या पाल्याचं लग्न निश्चित करत ..आज ती परिस्थिती राहिली नाही .आता पालक आपल्या पाल्याचं मत विचारात घेतात. कधीकधी पाल्यही त्याच्या विवाहाबाबत निश्चित निर्णय देतात.अशावेळी पालकांनी सारासार विचार करून, चर्चा करून विवाहाला संमती द्यावी . मोकळ्या मनाने स्वीकारावे म्हणजे क्लेष टळतात. जीवन सुसह्य होते. पालकांचे व पाल्यांचेही ! नववधू किंवा जावयानेही सासरचा योग्य सन्मान राखावा व सासरच्यांना आपलेसे करावे.वैवाहिक जीवनाच्या एकोणचाळीस वर्षांनंतरही मी दररोज स्वत:ला , आलेल्या नवीन परिस्थितीशी जुळवून घेत आहे .परस्परांच्या आवडीनिवडीत पार टोकाची भिन्नता असूनही आज मागे वळून पाहते तेव्हा असे वाटते की अरे, एवढी वर्षे आपण संसार निभावला ..!
माझ्या शेजारी वयाची 65 वर्षांंचे सहजीवन जगत असलेले काकाकाकू आहेत. किती छोट्याछोट्या गोष्टींनी एकमेकांना ते आनंद देत असतात ! ही खरी आनंदी जीवनाची भागिदारी !
हल्ली प्रेमविवाह मोठ्याप्रमाणात होऊ लागले आहेत आकर्षणालाच प्रेम समजून विवाह केला असेल तर तो काही काळाने कटकटीचाही होऊ शकतो अशावेळी प्रेमाने , सलोख्याने वागला नाही तर संसार मोडून पडतो म्हणून प्रेमविवाह विवेकविचारानेव एकमेकांना पारखून घेऊन करावा .घाई करू नये.एकमेकांना समजून घेत , स्वत:ही कधी बदलत, कधी नमतं घेत , एकमेकांना स्वीकारणं म्हणजे विवाह टिकवणं …!.हे आपल्या स्वत:साठी जेवढं फायदेशीर तेवढं समाज हितासाठीही फायदेशीर आहे .
आज समाजातील घटस्फोटित, दुभंगलेल्या, विभक्त कुटुंबातील मुलांची व त्या पतिपत्नींची जी वाताहत होते ती पाहून माझे मन द्रवते ! हे टाळणे शक्य होते असा पश्चात्ताप करण्याची वेळ त्या युगुलावर येते त्यावेळी जाणवतं की खरी वेळ तर निघून गेली आहे !
सुखी वैवाहिक जीवनासाठी, *आहे त्याचा स्वीकार करावा, त्याला आपलेसे करावे एकमेकांच्या भावनांचा, आवडीनिवडीचा आदर करत जगणं सुसह्य करावे .जीवनाचा आनंद घ्यावा.*हे सूत्र महत्त्वाचे वाटते.
पुष्पा कोल्हे
चेंबूर ,मुंबई 71
दि.05/05/2022
_______________________________
*संवाद मीडिया*
🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡
*प्रॉपर्टी विकणे आहे*
*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*
*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*
*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*
*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*
*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*
*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈
*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*
*👉पारदर्शक व्यवहार*🔍
#######################
*Advt link …👇*
*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*
🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡
*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*
*▪️घर धरून 03 गुंठे जागा*
*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*
*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*
*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*
*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*
*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*
*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*
————————————————