You are currently viewing रेडी येथे ८ ते १४ एप्रिल या कालावधीत भव्य दशावतारी नाट्य महोत्सव…

रेडी येथे ८ ते १४ एप्रिल या कालावधीत भव्य दशावतारी नाट्य महोत्सव…

प्रितेश राऊळ मित्रमंडळाचे आयोजन; नारायण राणेंच्या वाढदिवसाचे औचित्य…

वेंगुर्ले

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रेडी येथील दशावतार कलाप्रेमी ग्रुपच्या वतीने प्रितेश राऊळ मित्र मंडळ पुरस्कृत “भव्य दशावतार नाट्य महोत्सव” आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन ८ एप्रिलला सायंकाळी ६:०० वाजता होणार असून १४ एप्रिल पर्यंत दशावतारी नाट्यप्रयोगांचे सादरीकरण होणार आहे. तरी जास्तीत जास्त नाट्यप्रेमी व भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी याप्रसंगी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. राऊळ यांनी केले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले.
त्यात असे नमूद केले आहे की, ८ एप्रिलला सायंकाळी सहा वाजता या महोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर नाट्यप्रयोगांना सुरुवात होणार आहे. यावेळी पहिल्या दिवशी चेंदवणकर गोरे दशावतार नाट्य मंडळाचा शिवशक्ती वेताळ हा नाट्यप्रयोग सादर होईल. ९ एप्रिलला मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळ मोरे, कुडाळ यांचा कृष्ण पूजन, ११ एप्रिलला अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ यांचा पंढरीचा पहिला वारकरी, १२ एप्रिलला गुरूकृपा दशावतार नाट्य मंडळ यांचा द्रौपदी वस्त्रहरण, १३ एप्रिलला हेळेकर दशावतार नाट्य मंडळ , कारिवडे यांचा एक डाव नगीनीचा, तर १४ एप्रिलला सिद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळ, झरेबांबर, दोडामार्ग यांचा शापमुक्त आदी नाट्यप्रयोग सादर होणार आहेत. रेडी ग्रामपंचायत परिसरात हा महोत्सव संपन्न होणार असून दर दिवशी सायंकाळी ७:०० वाजता नाट्यप्रयोगांना सुरुवात होणार आहे. तरी जास्तीत जास्त दशावतार व नाट्यप्रेमी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. राऊळ यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा